मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund : म्यूचुयल फंड्स सही है! 'या' पाच फंडांमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Mutual Fund : म्यूचुयल फंड्स सही है! 'या' पाच फंडांमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Quant Infrastructure fund क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे झपाट्याने वाढले आहेत. येथे गुंतवणूकदारांची रक्कम एका वर्षात दुप्पट झाली.

Quant Infrastructure fund क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे झपाट्याने वाढले आहेत. येथे गुंतवणूकदारांची रक्कम एका वर्षात दुप्पट झाली.

Quant Infrastructure fund क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे झपाट्याने वाढले आहेत. येथे गुंतवणूकदारांची रक्कम एका वर्षात दुप्पट झाली.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 22 ऑक्टोबर : भारतात शेअर बाजाराची गुतंवणूकदारांची संख्या आणि आर्थिक जागरूकता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक होत आहे. देशात म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे त्याचे चांगले रिटर्न्स. पण म्युच्युअल फंड गुंतवणूकीतही धोका आहे. कारण ती शेअर बाजाराशी संबंधित आहे. Value Research च्या आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील 5 फंडांनी गुंतवणूकदारांचे पैसे गेल्या एका वर्षात दुप्पट केले आहेत. ज्यामध्ये पॉवर, कन्ट्रक्शन, कॅपिडल गूड्स् आणि मेटल विभागातील कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. 1. क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Quant Infrastructure fund) क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे झपाट्याने वाढले आहेत. येथे गुंतवणूकदारांची रक्कम एका वर्षात दुप्पट झाली. या योजनेने गेल्या एका वर्षात 118 टक्के रिटर्न दिले आहे. सरकारी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी योजना; दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा, कसा? 2. ICICI प्रूडेंशियल इन्फ्रास्ट्रक्चर (ICICI Prudential Infrastructure) आयसीआयसीआय प्रूडेंशियल कमोडिटीज फंडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे सर्वात वेगाने वाढले. येथे गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम एका वर्षात दुप्पट झाली. या योजनेने गेल्या एका वर्षात 108.6 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट 3. आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड (IDFC Infrastructure fund) आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात 104.8 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळाले आहेत. या फंडाची सिमेंट, वीज आणि ऊर्जा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. 4. एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंड (HSBC Infrastructure Equity fund) एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 102 टक्के रिटर्न दिले आहेत. PhonePe वापरणे महागलं? मोबाईल रिचार्जवर आकारले जातायेत अधिकचे पैसे 5. आदित्य बिर्ला सन लाईफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Aditya Birla Sun Life Infrastructure fund) आदित्य बिर्ला सन लाइफ इन्फ्रास्ट्रक्चर फंडने गेल्या एका वर्षात इतर फंडांपेक्षा थोडे कमी रिटर्न दिले आहे. गुंतवणूकदारांना 1 वर्षात 97.4 टक्के परतावा दिला आहे.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या