मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Fino Payments Bank IPO आजपासून खुला, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Fino Payments Bank IPO आजपासून खुला, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

fino payments bank IPO मध्ये 300 कोटींचा नवीन इश्यू आणि 900.29 कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. कंपनीचे प्रवर्तक OFS मध्ये 1,56,02,999 शेअर्स विकतील.

fino payments bank IPO मध्ये 300 कोटींचा नवीन इश्यू आणि 900.29 कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. कंपनीचे प्रवर्तक OFS मध्ये 1,56,02,999 शेअर्स विकतील.

fino payments bank IPO मध्ये 300 कोटींचा नवीन इश्यू आणि 900.29 कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. कंपनीचे प्रवर्तक OFS मध्ये 1,56,02,999 शेअर्स विकतील.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 ऑक्टोबर : फिनटेक पेमेंट कंपनी (Fino Payment Bank) चा IPO आज म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी उघडण्यात आला आहे. तुम्ही 2 नोव्हेंबरपर्यंत या इश्यूला सब्स्क्राईब करु शकता. कंपनी इश्यूमधून 1200 कोटी रुपये उभारणार आहे. या IPO मध्ये 300 कोटींचा नवीन इश्यू आणि 900.29 कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. कंपनीचे प्रवर्तक OFS मध्ये 1,56,02,999 शेअर्स विकतील.

IPO उघडण्याच्या एक दिवस आधी, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 538.78 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने सांगितले की त्यांनी अँकर गुंतवणूकदारांना 577 रुपये प्रति शेअर दराने 93,37,641 इक्विटी शेअर जारी केले आहेत आणि 539 कोटी रुपये उभारले आहेत.

अँकर गुंतवणूकदार

कंपनीच्या इश्यूमध्ये गुंतवणूक केलेल्या अँकर गुंतवणूकदारांमध्ये Pinebridge Global Funds, HSBC, Invesco Trustee, ITPL Invesco, Mathews Asia Small Finance Companies Fund, Fidelity Funds, Societe Generale आणि Segnati India Mauritius यांचा समावेश आहे. याशिवाय इतर काही अँकर गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक केली आहे. त्यापैकी BNP पारिबा, TATA MF, SBI Life Insurance, Motilal Oswal MF आणि आदित्य बिर्ला सनलाइफ हे ट्रस्टी आहेत.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरात वाढ कायम, तपासा तुमच्या शहरातील रेट

ब्रोकरेज कंपन्यांचा असा विश्वास आहे की कंपनीचे अॅसेड लाईट मॉडेल आणि लॉन्ग टर्म ग्रोथची शक्यता असूनही, त्याचे हाय वॅल्यूएशन गुंतवणूकदारांच्या अडचणीत भर घालू शकते. यामुळेच ब्रोकरेज कंपन्या यामध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.

मार्केट कॅप 4,8015 कोटी रुपये

Marwadi Shares and Finance च्या मते, कंपनीच्या इश्यू प्राईसमध्ये 560-577 रुपये समाविष्ट आहेत. त्यानुसार, लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे प्राईज टू बूक वॅल्यू 10.58 रुपये आहे आणि मार्केट कॅप 4,8015 कोटी रुपये आहे.

Shaktikanta Das आणखी तीन वर्षासाठी RBI चे गव्हर्नर, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

ब्रोकरेज फर्मने सल्ला दिला आहे की, कंपनीकडे चांगले बिझनेस मॉडेल आहे आणि त्यासाठी जास्त मालमत्तेची आवश्यकता नाही. यासोबतच ऑपरेशनल अनुभव आणि उत्तम कामाचा अनुभव लक्षात घेऊन गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे. कंपनीकडे एक युनिक डीटीपी फ्रेमवर्क आहे ज्यामुळे ती मार्केटला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष्य करू शकते.

किरकोळ गुंतवणूकदारांना 10 टक्के इश्यू

रिलायन्स सिक्युरिटीजने सांगितले की फिनो पेमेंट्स बँकेकडे अनेक सूचीबद्ध प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. बँकेचे 95 टक्के उत्पन्न हे शुल्क आणि कमिशनमधून येते. देशातील डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढवण्यावर कंपनीची वाढ अवलंबून आहे. फिनो पेमेंट्सने रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के इश्यू राखून ठेवला आहे. QIB साठी 75 टक्के आणि NII साठी 15 टक्के राखीव आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 3 कोटी शेअर्स बाजूला ठेवले आहेत.

First published:

Tags: Investment, Money, Share market