मराठी बातम्या /बातम्या /मनी /

काही केल्या टिकत नाही पैसा; तुमचा खिसा रिकामा राहण्याची ही आहेत कारणं

काही केल्या टिकत नाही पैसा; तुमचा खिसा रिकामा राहण्याची ही आहेत कारणं

Investment Tips: ‘या’ 4 सवयी तुम्हाला करतील कंगाल, वेळीच व्हा सावध

Investment Tips: ‘या’ 4 सवयी तुम्हाला करतील कंगाल, वेळीच व्हा सावध

पगारवाढ, बोनस मिळाला तरी दुसरीकडे खर्चाचा आकडा वाढतच असतो. यामागे नेमकी काय कारणं आहेत जाणून घ्या.

मुंबई, 22 सप्टेंबर : जीवनात स्वमालकीचं घर, गाडी, परदेश प्रवास आदी गोष्टी साध्य व्हाव्यात यासाठी प्रत्येक जण मेहनतीनं पैसा मिळवतो. तसंच मुलांचं शिक्षण, संभाव्य आजारपण किंवा आपत्कालीन स्थितीत आर्थिक तुटवडा जाणवू नये यासाठी बचतीवर (Saving) भर दिला जातो; पण कितीही पैसे हातात आले तरी ते टिकत नाहीत, योग्य बचत साध्य होत नाही, महिनाअखेरीला पैशांचा तुटवडा जाणवतो, अशी अनेकांची तक्रार असते. पगारवाढ, बोनस मिळाला तरी दुसरीकडे खर्चाचा आकडा वाढतच असतो. या गोष्टींमागे काही कारणं, तसच चुकीच्या सवयी (Bad Habits) असू शकतात. काही चुकीच्या सवयींमुळे हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे अशा सवयी वेळीच बदलणं गरजेचं असतं. काही जणांचा खर्च उत्पन्नापेक्षा (Salary Income) अधिक असतो. अशा व्यक्ती 'हाती पैसा टिकत नाही' अशी तक्रार वारंवार करताना दिसतात. त्यामुळे जीवनातलं ध्येय साध्य होण्यास अडचणी निर्माण होतात. वाढत्या खर्चामागे निश्चितपणे काही कारणं असू शकतात; पण त्यासाठी चुकीच्या सवयीदेखील कारणीभूत असतात. अशा सवयींमुळे आर्थिक ताळमेळ बिघडतो आणि खर्चाचं प्रमाण वाढतं. एका विशिष्ट वयात म्हणजेच कॉलेजमध्ये असताना मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणारा तरुण किंवा तरुणी एखाद्या साध्या दुकानात स्वस्तातले पदार्थ खरेदी करून त्याचा आस्वाद घेतात. बऱ्याचदा मित्र आपापसात कॉन्ट्रिब्युशन (Contribution) काढून खाद्यपदार्थ ऑर्डर करतात आणि त्यांचा आस्वाद घेतात; पण जेव्हा व्यक्ती नोकरी करायला लागते, तेव्हा ऑफिसमधल्या मित्रांसोबत बऱ्याचदा महागड्या हॉटेलमध्ये जाण्याची सवय अनेकांना लागते. तिथे महाग अन्नपदार्थ आणि ड्रिंक्स ऑर्डर केली जातात. याचा भार खिशावर पडतो. एका वेळी मोठा खर्च होतो. त्यामुळे अशी सवय लागली असेल, तर त्यावर नियंत्रण मिळावा. बाहेरचं खाणं कमी केल्यास काही पैसे नक्कीच वाचवू शकाल. हे वाचा - Amazon-Flipkart-Myntra Sale : सुरू होतायत Festival sale; फसवणुकीचा धोका, अशी करा स्मार्ट Online shopping चांगली, दर्जेदार जीन्स (Jeans) केवळ 900 रुपयांत मिळत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून मॉलमध्ये जाऊन 4900 रुपयांची महागडी जीन्स खरेदी करणाऱ्या काही व्यक्ती असतात. याचाच अर्थ त्या शो ऑफ करत असतात. स्वस्त पर्याय उपलब्ध असताना महागडी जीन्स खरेदी करून त्या व्यक्ती खिसा रिकामा करतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात. 'पैसा वेळेला जितका मिळतोय तितका खर्च करा,' असा विचार काही व्यक्ती करतात. विशेष म्हणजे चांगलं उत्पन्न असणाऱ्या अनेक व्यक्तीदेखील असा विचार करतात. 40 रुपयांच्या छोले-राइसमध्ये पोट सहज भरणं शक्य असताना त्याऐवजी 400 रुपयांचा पिझ्झा ऑर्डर करून खातात. अशा व्यक्ती स्वतःमुळे आर्थिक अडचणीला (Economic Crisis) सामोऱ्या जातात. हे वाचा - एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही 'या' चूका, नाहीतर Offer पडेल महागात काही व्यक्ती गरजेपेक्षा छंद किंवा आवड म्हणून शॉपिंग (Shopping) करतात. अशा व्यक्तींना नेहमीच पैशांची अडचण भासत असते. शॉपिंगवेळी एखादी वस्तू खरेदी करताना खरोखरच त्या वस्तूची गरज आहे का असा विचार करावा. छंद किंवा आवड म्हणून अजून एखादं काम शोधणं आर्थिक स्थितीला हातभार लावू शकतं. त्याउलट अशा अविचारी शॉपिंगमुळे खिसा रिकामा होऊ शकतो. `अंथरुण पाहून पाय पसरावेत,` अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ज्या व्यक्ती कमाईच्या तुलनेत जास्त खर्च करतात, त्यांच्यासाठी ही म्हण चपखल ठरते. तुमचा पगार 20 हजार रुपये आणि खर्च 25 हजार रुपये असेल तर साहजिकच तुम्हाला बचत करणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अशा काही सवयी दूर ठेवल्या तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अवघड नाही.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या