Home /News /money /

ऑनलाईन पेमेंट करताय? 3 वर्षांमध्ये 74 टक्के लोकांना पैसे मिळालेच नाही!

ऑनलाईन पेमेंट करताय? 3 वर्षांमध्ये 74 टक्के लोकांना पैसे मिळालेच नाही!


जर या फसवणुकीची तक्रार तुम्ही 3 दिवसांच्या आत केली तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.

जर या फसवणुकीची तक्रार तुम्ही 3 दिवसांच्या आत केली तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.

जर या फसवणुकीची तक्रार तुम्ही 3 दिवसांच्या आत केली तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.

    मुंबई, 04 ऑगस्ट : देशात डिजिटलयाझेशन (Digitalisation) झालं त्याचे जसे फायदे झाले तसेच आर्थिक घोटाळ्यांतही वाढ झाली. देशात आता अगदी छोट्या स्तरावरही डिजिटल पेमेंटचा वापर वाढत आहे आणि बहुतेक भारतीय Bhim, Gpay, Phonepe किंवा अन्य Apps वापरतात. हे डिजिटल पेमेंट (Digital Payment ) करताना गेल्या 3 वर्षांमध्ये 42% भारतीयांना आर्थिक धोका म्हणजेच फायनॅन्शियल फ्रॉडचा (Financial Fraud) अनुभव आला आहे असं लोकल सर्व्हिस या खासगी फर्मने केलेल्या एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. यात सगळ्यांत महत्त्वाची आणि काळजीची गोष्ट अशी की यातील 74% लोकांना त्यांचे पैसे परत मिळवण्यात अपयश आलं आहे. या लोकांना त्यांचे गेलेले पैसे परत मिळालेलेच नाहीत. 2021च्या ऑक्टोबर महिन्यात लोकल सर्व्हिसने हा सर्व्हे केला होता. 29% नागरिक त्यांचा एटीएम किंवा डेबिट कार्ड पिनचे डिटेल्स (ATM or Debit Card Details) जवळचे लोक किंवा कुटुंबामध्ये शेअर करतात, असं या सर्व्हेमधून समोर आलं आहे. तर 4% लोक हा पासवर्ड त्यांच्या घरातील किंवा ऑफिसच्या कर्मचाऱ्यांबरोबर शेअर करतात असंही स्पष्ट झालं. 33% नागरिक त्यांचं बँक खातं, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आणि एटीएम पासवर्ड, आधार आणि पॅनकार्ड नंबर त्यांच्या ईमेल किंवा कम्प्युटरवर संग्रहित म्हणजेच सेव्ह करतात. तर 11% लोकांनी ही सगळी माहिती त्यांच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केल्याचं या सर्व्हेमधून समोर आलं. Microsoft 2021 ग्लोबल टेक सपोर्ट स्कॅम रिसर्च यांच्या रिपोर्टनुसार 2021 मध्ये 69% भारतीय ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 2021-22 मध्ये 60,414 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेची माहिती आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये भारतात फसवणुकीमुळे दरदिवशी कमीतकमी 100 कोटींचं नुकसान झाल्याचं RBI च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ही फसवणूक कोणत्या प्रकारची होते याबद्दलही या रिपोर्टमध्ये माहिती आहे. जवळपास 29% ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यातून फसवणूक झाल्याचं सांगितलं. तर ई-कॉमर्स साईट्सद्वारे फसवणूक झाल्याचं 24% ग्राहकांनी सांगितलं. अन्यप्रकारे फसवणूक झाल्याचं 21% ग्राहकांनी सांगितलं. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे फसवणूक 18% ग्राहकांनी फसवणूक झाल्याचं समोर आलं, 12% ग्राहकांनी त्यांची आर्थिक फसवणूक मोबाईल Apps द्वारे फसवणूक झाल्याचं सांगितलं, 8% लोकांनी एटीएम कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचं सांगितलं तर 6% लोकांनी विम्याच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगितलं. फसवणूक झाल्यास काय करावं? अशा प्रकारची कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित बँकेला कळवावं असं रिझर्व्ह बँकेनं (RBI) म्हटलं आहे. तुम्ही जर सायबर फ्रॉडला बळी पडलात (Online Financial Fraud) आणि तुमच्या खात्यातून पैसे गेले तर तुम्हाला त्याची तक्रार तीन दिवसांच्या आत करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर https://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातही याबद्दल तक्रार करू शकता. वेळेवर तक्रार केल्यास 10 दिवसांच्या आत रिफंड जर या फसवणुकीची तक्रार तुम्ही 3 दिवसांच्या आत केली तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. तुम्हाला 10 दिवसांच्या आत तुमची रक्कमही परत मिळेल. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडला बळी पडल्यावर कृपया गप्प बसू नका. तुम्हाला या फसवणुकीबद्दल बँकेला आवश्यक ती सर्व माहिती लिखित स्वरूपात देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तक्रार करणंही गरजेचं आहे. हेल्पलाईन सायबर फ्रॉडमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाच्या भरपाईसाठी एक नॅशनल हेल्पलाईन लाँच करण्यात आली आहे. 155260 हा त्या हेल्पलाईनचा नंबर आहे. सध्या ही सेवा छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसारख्या 7 राज्यांमध्ये उपलब्ध आहे. अन्य राज्यांतही याचा लवकरच विस्तार होणार आहे. ऑनलाईन पेमेंट, डिजिटलायझेशन ही काळाची गरज आहे. पण या पद्धतीने व्यवहार करताना काळजी घ्या.
    First published:

    पुढील बातम्या