1 ऑक्टोबरपासून 'या' गोष्टी बदलतायत, नेहमीच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

1 ऑक्टोबरपासून 'या' गोष्टी बदलतायत, नेहमीच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

SBI, GST - 1 ऑक्टोबरपासून तुमच्या आयुष्यात हे बदल होणार आहेत. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर :  ऑक्टोबर महिना सुरू होतोय. या महिन्यात बरेच आर्थिक बदल होतायत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर नक्की होणार. 1 ऑक्टोबरपासून SBI, GST, काॅर्पोरेट टॅक्ससहित अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्याचा परिणाम सगळ्यांच्या आयुष्यावर होणार आहे. आजपासून अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये बदल होणार आहेत.

1. SBI मध्ये या गोष्टी मिळणार मोफत - आता 1 ऑक्टोबरपासून तुम्ही 1 महिन्यात तुमच्या खात्यात फक्त 3 वेळा पैसे जमा करू शकता. तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळा पैसे जमा केलेत तर 50 रुपये जास्त चार्ज लागेल. शहरांमध्ये कमीत कमी बॅलन्स 5 हजार रुपयांऐवजी 3 हजार रुपये केला जाणार आहे. नव्या नियमांच्या बदलाप्रमाणे ग्राहक आपल्या खात्यात कमीत कमी 3 हजार रुपये बॅलन्स ठेवू शकत नसेल आणि त्याची रक्कम 1500 रुपये झाली, तर त्यावर 10 रुपयांचा चार्ज आणि जीएसटी वसूल केला जाईल. सेमी अर्बन ब्रँचमध्ये एसबीआय ग्राहकांना आपल्या खात्यात महिन्याला कमीत कमी 2 हजार रुपये ठेवावे लागतील. ग्रामीण शाखेत 1 हजार रुपये कमीत कमी ठेवावे लागतील.

वाचा - ऑक्टोबरमध्ये 11 दिवस बँकांना सुट्ट्या, 'ही' आहे पूर्ण लिस्ट

2. OBC चा रेपो रेट लिंक्ड रिटेल कर्ज 8.35 टक्क्यांवर मिळेल - ओरिएंटल बँक ऑफ काॅमर्स (OBC)नं रेपो रेटवरून लिंक्ड नवा रिटेल आणि MSE लोन प्राॅडक्ट लाँच केलाय. यामुळे रेपो रेटवरून लिंक्ड होम लोनचे व्याज दर 8.35 टक्क्यांपासून सुरू होतील.

3. ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलेल - केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल करतंय. नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतायत. कारचं रडिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)सोबत ड्रायव्हिंग लायसन्स कायद्यानं गरजेचं आहे. पण आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी दोघांमध्येही बदल होणार आहेत.

वाचा - जेव्हा ट्रम्प-मोदींसाठी अमेरिकन दूतावास गातं हे धम्माल गाणं, पाहा VIRAL VIDEO

4. ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात झाले बदल - 1 ऑक्टोबरपासून SBI चे एटीएम चार्जेस बदललेत. मेट्रो शहरात ग्राहक 10 वेळा फ्री डेबिट ट्रॅन्झॅक्शन करू शकतात. इतर ठिकाणी 12 वेळा ट्रॅन्झॅक्शन करता येईल.

5. अनेक गोष्टींचा जीएसटी (GST) कमी झालाय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी GST काउन्सिलच्या बैठकीत मोठे निर्णय घेतले. कराचं ओझं कमी झालं. काही गोष्टींवरचा कर वाढलाय. म्हणजे आता 1 ऑक्टोबरपासून काही वस्तू स्वस्त होणार. आता हाॅटेलमध्ये 1000 रुपयांपर्यंतच्या रुमला टॅक्स नाही. 7500 रुपयापर्यंतच्या रुमला आता फक्त 12 टक्के जीएसटी द्यावं लागेल. जीएसटी काउन्सिलनं 28 टक्के जीएसटीमध्ये येणारी 10 ते 13 सीट्सचे पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवरचा सेस कमी केलाय.1200 सीसीच्या पेट्रोल वाहनांवरच्या सेसचा दर 1 टक्के आणि 1500 सीसीच्या डिझेल वाहनांवर 3 टक्के कर दिला गेलाय. दोन्ही प्रकारच्या वाहनांवर सेस 15 टक्के आहे. तर जीएसटीवर 28 टक्के आहे.

वाचा - कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा, मिळाली 'इतकी' मदत

6. पेन्शन पाॅलिसीत बदल - कर्मचाऱ्याचा मृत्यू  नोकरीत असताना 7 वर्षात झाला तर कुटुंबाला 50 टक्के पेन्शन मिळायचं. आता त्यात वाढ केलीय.

7. प्लॅस्टिक बंदी - मोदी सरकारनं 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लॅस्टिक बंदी करायची तयारी केलीय. यामध्ये प्लॅस्टिक बॅग, कप आणि स्ट्राॅ यावर बंदी असेल.

8. काॅर्पोरेट टॅक्समध्ये बदल - अर्थमंत्र्यांनी काॅर्पोरेट टॅक्स कमी केल्यानं फायदा अनेक कंपन्यांना होतोय. त्यानं अनेक दिवस पडलेला शेअर बाजारही वधारलाय.

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

Published by: Sonali Deshpande
First published: September 28, 2019, 2:38 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading