आर्थिक तोट्यामुळे 'या' कंपन्या लवकरच बंद होणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय

आर्थिक तोट्यामुळे 'या' कंपन्या लवकरच बंद होणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय

आर्थिक तोट्यात सापडल्यामुळे या दोन कंपन्या लवकरच बंद करण्याचा सल्ला अर्थमंत्र्यांनी सरकारला दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL)या दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DOT)दोन्ही कंपन्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी जवळपास 74 हजार कोटींचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी धुडकावून लावला. अर्थमंत्र्यांनी दोन्ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी बंद करण्याचा सल्लाही दिला आहे.

एकेकाळी बीएसएनएल आणि एमटीएनएल हे दोन्ही देशात सर्वात मोठं टेलिकॉम नेटवर्क म्हणून ओळखलं जात होतं. आजही कित्येक गावांमध्ये फक्त बीएसएनएल नेटवर्क मिळतं. तर जिथे खासगी मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क मिळत नाही अशा ठिकाणीही बीएसएनएलचं नेटवर्क मिळत असल्यानं त्याचा वापर एकेकाळी सर्वाधिक होता. मात्र खासगी टेलिकॉम कंपन्या आणि महत्त्वाचं म्हणजे जिओच्या उदयानंतर मात्र बीएसएनएल टेलिकॉर्म कंपनीला उतरती कळा लागली. जिओमुळे त्यांचा तोटा अधिक वाढला आणि कंपनीच्या अडचणीत वाढ झाली.

बीएसएनएल कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. आणि रिलायन्स, जिओ आल्यानंतर तर आणखीच तोटा वाढल्यानं अर्थमंत्र्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बीएसएनएलला 31 हजार 287 कोटींचा तोटा झाला आहे. याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन, स्वेच्छा निवृत्ती यागळ्या गोष्टींवरही विचारविनीमय सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

फायनाशियस एक्स्प्रेसच्या अहवालानुसार बीएसएनएल आणि एमटीएनएल 1.65 लाख कर्मचाऱ्यांना अद्याप आकर्षित रियारर्मेंट प्लॅन देणं आणि कंपनीवरील कर्ज फेडणं आणि त्यानंतर कंपनी बंद करण्यासाठी सरकारला साधारण 95 कोटींचा खर्च येण्याची चिन्हं आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यानं तेही देणं बाकी आहे. तर निवृत्तीचं वयही 60 वरुन 58 करण्याचा प्रस्तावही कंपनीला अर्थमंत्र्यांनी दिला होता.

आर्थिक संकटात सापडल्यानं अर्थमंत्र्यांनी दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे कंपनीला संजीवनी देण्यासाठी काही प्रस्ताव असतील तर तेही मागवण्यात आले आहेत. दोन्ही कंपन्या बंद झाल्या तर मोठं नुकसान होणार आहे. 2019च्या आर्थिक वर्षात बीएसएनएलला एकूण 13 हजार 804 कोटींचा तोटा झाला आहे.

दोन्ही कंपन्या जर बंद झाल्या तर कंपनीतील कर्मचाऱी बेरोजागार होतील त्यामुळे कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली होती.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2019, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading