• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • खुशखबर! आता कर्मचाऱ्यांचा PF भरणार केंद्र सरकार; आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार

खुशखबर! आता कर्मचाऱ्यांचा PF भरणार केंद्र सरकार; आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ही माहिती दिली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जून: कोरोनामुळे (Corona virus) देशाची अर्थव्यवस्था (Economy) ढासळली आहे. या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Government of India) प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rozgar Yojna) 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच देशातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance minister Nirmala Sitaraman) यांनी आज ही माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (PF) म्हणजेच PF चा खर्च उचलणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये हजार किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कंपनी PF चा तसंच कर्मचाऱ्यांच्या वाट्याचा PF केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. तर ज्या कंपन्यांमध्ये हजारहून जास्त कर्मचारी आहेत अशा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वाट्याचा PF केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. हे वाचा - IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण? IIT आणणार हे नवे कोर्सेस कोणाला मिळणार लाभ जे कर्मचारी आधी EPFO म्हणजे प्रॉव्हिडंट फंडच्या वेबसाईटवर (EPFO) रजिस्टर नव्हते किंवा कोरोनाकाळात ज्यांचा रोजगार गेला होता अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 15,000 किंवा त्यापेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी ज्यांची कंपनी EPFO निगडीत आहे. तसंच ज्यांचा रोजगार 01.03.2020 ते 30.09.2020 या कालावधीत गेला होता अशा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारकडून ही योजना 1 ऑक्टोबर 2020 ला लागू करण्यात आली होती 30 जून 2021 पर्यंत ही योजना होती. मात्र आता केंद्र सरकारकडून या योजनेला वाढवण्यात आलं आहे. कोरोनासाठी विशेष पॅकेज कोरोना बाधित क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांनी 1.1 लाख कोटी रुपयांची पत हमी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) तब्बल 50,000 कोटी ठेवले आहेत. तर इतर क्षेत्रांसाठी 60,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी जाहीर केली आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: