आज संध्याकाळी 5 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार मोठी घोषणा

आज संध्याकाळी 5 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार मोठी घोषणा

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज एक मोठी घोषणा करू शकतात. CNBC आवाज च्या सूत्रांनुसार, आर्थिक क्षेत्र, एमएसएमई, रिअल इस्टेट, बँक या क्षेत्रांसाठी काही घोषणा होतील, अशी अपेक्षा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज एक मोठी घोषणा करू शकतात. रॉ़यटर्स या वृत्तसंस्थेनुसार, अर्थमंत्री एका पॅकेजची घोषणा करणार आहेत. यामध्ये ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रासाठी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. CNBC आवाज च्या सूत्रांनुसार, आर्थिक क्षेत्र, एमएसएमई, रिअल इस्टेट, बँक या क्षेत्रांसाठी काही घोषणा होतील, अशी अपेक्षा आहे.

परदेशी गुंतवणुकीसाठी काही योजना

फायनान्शिअल मार्केटच्या सुधारणांसाठी सरकार काही निर्णय घेणार आहे. परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठीही सरचार्जमध्ये सूट देण्याचा सरकारचा विचार आहे.

2 कोटींचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यासाठी सरचार्ज वाढवण्याचा निर्णय निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला होता.

बँकिंग क्षेत्रावर मंदीचं सावट,आता या बँकेतही होणार नोकरकपात

याआधीच देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे. या आराखड्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.यामध्ये सरकारने उद्योगांसाठी कर सवलत, अनुदान अशा योजना आणल्या आहेत. उद्योगांवरचा आर्थिक भार कमी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर भारतात उद्योग करणं उद्योजकांसाठी सोपं व्हावं यासाठीही सरकारने एक प्लॅन बनवला आहे.

प्रामाणिक करदात्यांना त्रास देणार नाही

सरकारने महसूल विभागाला सोबत घेऊन एक आराखडा बनवला आहे. जे लोक प्रामाणिकपणे कर भरतात अशा लोकांना त्रास दिला जाणार नाही, ज्या करदात्यांनी किरकोळ चुका केल्या असतील त्यांनाही हैराण केलं जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हे जाहीर केलं आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्रात मागणी घटल्याबदद्ल चिंता व्यक्त होते आहे. ग्राहकांच्या हाती जास्त पैसे असले तर मागणी वाढेल आणि मालाची विक्रीही होईल. त्यामुळेच अप्रत्यक्ष दरात कपात करण्याचाही सरकारचा विचार आहे.

==========================================================================================================

VIDEO: एअर इंडिया अडचणीत येण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading