Home /News /money /

नोकरदार-उद्योजकांना मिळणार दिवाळी गिफ्ट! आज निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

नोकरदार-उद्योजकांना मिळणार दिवाळी गिफ्ट! आज निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister of India Press Conference) आज 12.30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. अशी शक्यता आहे की आणखी एकदा मदत आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाईल

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister of India) आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अर्थमंत्री आज आणखी एका आर्थिक मदत पॅकेजची घोषणा करू शकतात. रोजगाराला चालना देण्यासाठी या पॅकेजमध्ये विशेष योजना असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या प्रोत्साहन पॅकेजमध्ये पीएफ सबसिडी देण्याची घोषणा करू शकते. हे अनुदान कर्मचारी आणि रोजगारनिर्मिती करणारी कंपनी दोघांसाठी 10 टक्के पीएफ स्वरूपात असू शकते. केंद्र सरकारने 31 मार्च रोजी पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana) बंद केली होती. मात्र सरकार पुन्हा एकदा ही योजना बनवण्याचा प्लॅन आखत आहे. 26 सेक्टरसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार केव्ही कामत कमिटीकडून 26 सेक्टर्ससाठी करण्यात आलेल्या शिफारसींनुसार ही घोषणा केली जाईल. या सेक्टर्समधील कंपन्यांसाठी आपात्कालीन क्रेडिटची घोषणा केली जाईल. या घोषणेअंतर्गत या कंपन्यांना विना गॅरंटीचे कर्ज मिळेल. दरम्यान कंपन्यांप्रमाणे हे पॅकेज असेल अशी सूत्रांची माहिती आहे. या माहितीनुसार जास्त मोठ्या रकमेची घोषणा होईल अशी आशा कमी आहे. नोकरदारांना दिवाळी गिफ्ट- मनी कंट्रोलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव अंतिम केला असून सरकार पुढील आर्थिक पॅकेजमध्ये या योजनेची घोषणा करू शकते. पुढील दोन वर्षांसाठी अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. मात्र ही योजना सुरू होण्यास 6-7 महिने लागू शकतात. कुणाला मिळणार फायदा? या प्रस्तावानुसार या सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचा पगार 15000 रुपये प्रति महिनापेक्षा जास्त असता कामा नये. यापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एखाद्या विद्यमान कंपनीत 50 किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असल्यास त्या कंपनीला किमान दोन नवीन भरती करण्यास सांगितले जाऊ शकते. जर त्यात 50 हून अधिक कर्मचारी असतील तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी पाच नवीन नोकरभरती कराव्या लागतील. (हे वाचा-PM Kisan: तुमच्या खात्यामध्ये 18 दिवसानंतर येणार 2000 रुपये! त्याआधी पूर्ण काम) पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेच्या वेबसाइटनुसार, एक नवीन कर्मचारी तोच आहे जो 1 एप्रिल 2016 आधी ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कंपनीत काम करत नाही. जर या नव्या कर्मचार्‍याकडे नवे यूएएन (UAN) नसेल तर ते नियोक्त्याकडून (रोजगार देणारी कंपनी) ईपीएफओ पोर्टलद्वारे प्रदान केले जाते
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Money, Nirmala Sitharaman

    पुढील बातम्या