शेअर बाजारात दिवाळी; गुंतवणुकदारांनी एका तासात कमावले 5 लाख कोटी!

शेअर बाजारात दिवाळी; गुंतवणुकदारांनी एका तासात कमावले 5 लाख कोटी!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपन्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करताच शेअर बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपन्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करताच शेअर बाजारात तेजी आली.अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणे पाठोपाठ मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 1 हजार 600 अंकांनी वधारला तर निफ्टीत देखील 357 अंकांची वाढ झाली. शुक्रवारी सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा मंदीचे वातावरण होते. पण अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्के करण्यात आला आहे. या घोषणेनंतर बँक निफ्टी, मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्समधील शेअरमध्ये तेजी आली.

त्यानंतर दुपारच्या सत्रात शेअर बाजारातील या तेजीने आणखी वेग पकडला. दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 2 हजार अंकांची वाढ झाली होती. यामुळे गुंतवणुकदारांनी एका तासात 5 लाख कोटी रुपये कमावले.

BSEने दिलेल्या माहितीनुसार बाजारात तेजी आल्यानंतर काही मिनिटातच बाजारमुल्य 143.45 लाख कोटींवर पोहोचले. हेच बाजारमुल्य गुरुवारी 138.54 लाख कोटी इतके होते. याचाच अर्थ बाजार मुल्यात 5 लाख कोटींची वाढ झाली. BSEचा इतिहास पाहता 10 वर्षात प्रथमच एका दिवसात सेन्सेक्समध्ये 2 हजार अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये देखील 500 अंकांची वाढ होत तो 11 हजार 250वर पोहोचला.

अर्थमंत्री म्हणाले...

> कॉर्पोरेट टॅक्समधील कपात नव्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांसाठी देखील लागू होणार आहे. जर कंपनीने अन्य कोणतीही सवलत घेतली नसेल तर त्यांना केवळ 22 टक्के टॅक्स द्यावा लागेल. सरचार्जसह एकूण टॅक्स 22.17 टक्के इतका असेल. ही तरतूद 2019-20 या आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहे.

> ऑक्टोबर 2019 नंतर नोंदणी झालेल्या कंपन्यांना 15 टक्के कर द्यावा लागले. सरचार्जसह हा टॅक्स 17.01 टक्के असेल.

> कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे सरकारला 1.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

शेअर बाजारात दिवाळी

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणानंतर शेअर बाजारात दिवाळी सुरु झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1 हजार 600 अंकांनी वाढला. शेअर बाजारातील बँकिंग आणि ऑटो कंपन्यांचे शेअर सर्वाधिक तेजीत होते. निफ्टी देखील अनेक दिवसानंतर 11 हजारच्या स्तरावर पोहोचला.

मेक इन इंडियाला प्रोत्साहन

सरकारने मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी इनमक टॅक्स कायद्यात एक कलम जोडले आहे. आर्थिक वर्ष 2019-20मध्ये 1 ऑक्टोबरनंतर नोंदणी होणाऱ्या देशातील कंपन्यांना 15 टक्के दराने कर द्यावा लागेल. अशा कंपन्यांनी जर 31 मार्च 2023च्या आधी उत्पादन सुरु केले तर त्यांना 15 टक्केच कर द्यावा लागेल. यात सरचार्ज व सेस जोडल्यावर तो 17.10 टक्के इतका कर द्यावा लागेल.

'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंची सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

First published: September 20, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading