मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पेट्रोल भरणं आणि LPG घेणं होणार स्वस्त, BPCL, SBIचं नवीन कार्ड झालं लाँच

पेट्रोल भरणं आणि LPG घेणं होणार स्वस्त, BPCL, SBIचं नवीन कार्ड झालं लाँच

एसबीआय आणि बीपीसीएलच्या या कार्डामुळे ज्या ग्राहकांना इंधन खरेदीवर मोठा खर्च करावा लागतो, त्यांना जास्तीत जास्त बचत करता येणार आहे.

एसबीआय आणि बीपीसीएलच्या या कार्डामुळे ज्या ग्राहकांना इंधन खरेदीवर मोठा खर्च करावा लागतो, त्यांना जास्तीत जास्त बचत करता येणार आहे.

एसबीआय आणि बीपीसीएलच्या या कार्डामुळे ज्या ग्राहकांना इंधन खरेदीवर मोठा खर्च करावा लागतो, त्यांना जास्तीत जास्त बचत करता येणार आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 16 डिसेंबर: ग्राहकांना आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरणं आणि LPG घेणं आणखी स्वस्त होणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI)  मंगळवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) समवेत  बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन ( BPCL SBI Card Octane)  लाँच केले आहे. या कार्डामुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. एसबीआय आणि बीपीसीएलच्या या कार्डामुळे ज्या ग्राहकांना इंधन खरेदीवर मोठा खर्च करावा लागतो, त्यांना जास्तीत जास्त बचत करता येणार आहे. तसेच ग्राहकांना एलपीजी, डिपार्टमेंटल स्टोअर आणि किराणा दुकानांमध्ये खरेदी केल्यावर अनेक फायदे मिळणार आहेत. ज्या ग्राहकांचा पेट्रोल, डिझेलवर मोठा खर्च होतो, त्यांना विशेष फायदा मिळावा, या अनुषंगाने हे कार्ड तयार करण्यात आले आहे. जाणून घेऊ या कोणाला किती आणि कसा फायदा मिळणार... एसबीआय कार्ड कंपनीने सांगितले आहे की, बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन, बीपीसीएल फ्युएल (BPCL Fuel) आणि मॅक ल्युब्रिकेंट (MAC Lubricants), भारत गॅस (LPG) वर खर्च (केवळ वेबसाईट आणि ॲपवरुन) आणि बीपीसीएलच्या इन आणि आउट सुविधा दुकानांमध्ये खरेदी केल्यानंतर ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट मिळतील. बीपीसीएलच्या (BPCL) पेट्रोल पंपांवर इंधन आणि ल्युब्रिकेंट खरेदी केल्यावर ग्राहकांना 7.25 टक्के कॅशबॅक (एक टक्का सेस सूटसहित) मिळेल. भारत गॅस (Bharat Gas) खरेदीवर 6.25 टक्के कॅशबॅक मिळेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! साखर निर्यातीबाबत मोठा निर्णय याशिवाय डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि किराणा दुकानांसह नियमित खर्चाच्या वर्गवारीत पण ग्राहकांना लाभ मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,  हे कार्डधारक देशभरातील 17,000 पेक्षा जास्त बीपीसीएल (BPCL) पेट्रोल पंपांवर सवलतींचा लाभ घेऊ शकतील. यात इंधन खरेदी करताना कोणत्याही कमाल किंवा किमान खरेदीची सीमा नाही. यामुळे ग्राहक प्रत्येकवेळी इंधन खरेदी करताना अर्थिक बचत करु शकतात. महिंद्रा समुहाच्या कंपनीवर कर्जाचा डोंगर,तोट्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड अयशस्वी एसबीआय कार्डचे (SBI Card) एमडी आणि सीईओ अश्विनीकुमार तिवारी म्हणाले, की आम्ही ग्राहकांना सर्वेत्तम उत्पादने देऊ इच्छितो. त्या दिशेने आम्ही हे पाऊल टाकले आहे. यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होईल. देशभरात भारत पेट्रोलियमचे मोठे नेटवर्क आहे. तेथे इंधन आणि ल्युब्रिकेंटच्या खरेदीवर बचत होण्यापासून ते अन्य वस्तुंची खरेदी ग्राहकांना चांगली फायदा देणारी ठरु शकते.
First published:

Tags: SBI

पुढील बातम्या