ITR भरण्यासाठी आता उरले फक्त 10 दिवस, नाहीतर पडेल भुर्दंड

ITR भरण्यासाठी आता उरले फक्त 10 दिवस, नाहीतर पडेल भुर्दंड

31 ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत ITR भरला नाही तर त्यासाठी दंड भरावा लागेल. 31 ऑगस्ट 2019 नंतर 31 डिसेंबर 2019 पर्यंत ITR भरला तर त्यासाठी 5 हजार रुपयांचा दंड आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : या आर्थिक वर्षाचे इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 ऑगस्टची डेडलाइन आहे. म्हणजेच ITR भरण्यासाठी फक्त 10 दिवस उरले आहेत. डेडलाइन जवळ आल्याच्या अगदी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळायची असेल तर लवकरात लवकर ITR भरा, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

फक्त 7 मिनिटांत भरा ITR

इनकम टॅक्स विभागाने कर भरणाऱ्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. करदाते ई फायलिंगच्या माध्यमातून रिटर्न फाइल करू शकतात. ही सर्व्हिस https://www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत पोर्टलवर सुरू आहे. याला e-filing Lite सुविधा असं नाव देण्यात आलं आहे.

31 ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत ITR भरला नाही तर त्यासाठी दंड भरावा लागेल. 31 ऑगस्ट 2019 नंतर 31 डिसेंबर 2019 पर्यंत ITR भरला तर त्यासाठी 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही 1 जानेवारी 2020 पासून 30 मार्च 2020 पर्यंत ITR भरला तर 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना उशिराचा दंड म्हणून 1 हजार रुपये भरावे लागतील.

नोकरदारांना मोदी सरकार देणार खूशखबर! 2 मोठ्या निर्णयांची शक्यता

ITR भरल्यानंतर तो व्हेरिफाय करण्याचीही गरज असते. जर व्हेरिफाय केलं नाही तर ते अधिकृत धरलं जात नाही. रिटर्न्स भरल्यानंतर आपण आधार OTP च्या माध्यमातून व्हेरिफाय करू शकतो. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडलेला असायला हवा. तुमच्या मोबाइल नंबरवर OTP आल्यानंतर तो इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर टाका. त्यानंतर तुमचे रिटर्न्स व्हेरिफाय होतील. याशिवाय तुम्ही बँकेचं ATM, DMAT अकाउंट आणि नेट बँकिंगच्या माध्यमातूनही ITR व्हेरिफाय करू शकता.

तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर ITR भरणं आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाची मर्यादा 3 लाख आणि 80 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.

===============================================================================================

VIDEO: हिना पांचाळ आता हिंदी 'बिग बॉस'च्या घरात? पाहा EXCLUSIVE मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या