मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ITR भरणं आता आणखी सोपं; SBI च्या YONO App वर फ्रीमध्ये रिटर्न भरण्याची सुविधा

ITR भरणं आता आणखी सोपं; SBI च्या YONO App वर फ्रीमध्ये रिटर्न भरण्याची सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना आपल्या योनो अ‍ॅपवरून (YONO App) फ्रीमध्ये इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची सुविधा दिली आहे. SBI कडून करण्यात आलेल्या एका ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : इनकम टॅक्स रिटर्न Income Tax Return (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे रिटर्न फाईल करण्यासाठी आता केवळ तीन दिवस बाकी आहेत. जर आयटीआर भरण्यात काही समस्या असल्यास, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन सुविधा सुरू केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना आपल्या योनो अ‍ॅपवरून (YONO App) फ्रीमध्ये इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची सुविधा दिली आहे. SBI कडून करण्यात आलेल्या एका ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. असेसमेंट ईयर 2020-21 साठी आयटीआर (ITR) फाईल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. जर तुम्ही अद्यापही ITR फाईल केला नसल्यास, एसबीआयच्या या स्किमचा फायदा घेऊ शकता.

(वाचा - नव्या वर्षात 56 दिवस बँका बंद, पाहा RBI ने जाहीर केलेली Holiday list 2021)

'सेव्हिंगही आणि आयटीआर फाइलिंगही' YONO वर Tax2win सह इनकम टॅक्स रिटर्न मोफत फाईल करा. तसंच CA ची सेवाही घेता येऊ शकते. या सर्व्हिससाठी फी द्यावी लागेल. ही फी 199 रुपयांपासून सुरू होते. रिटर्न फाईल करताना काही समस्या आल्यास, +91 9660-99-66-55 या नंबरवर कॉल करून मदत घेऊ शकता किंवा support@tax2win.in वर ईमेलही करू शकता.

सर्वात आधी YONO SBI अ‍ॅप ओपन करून लॉगइन करा. त्यानंतर shop and order वर जा. नंतर tax and investment वर क्लिक करा. त्यानंतर Tax2Win दिसेल. इथे संपूर्ण माहिती मिळेल.

(वाचा - आजपासून इथे मिळेल स्वस्तात सोनं खरेदीची संधी; जाणून घ्या काय आहे किंमत)

इनकम टॅक्स डिपार्टमेंटनुसार, रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 6,90,617 आयटीआर फाईल झाले आहेत. यात 60,395 रिटर्न केवळ शेवटच्या एका तासात फाईल झाले आहेत. असेसमेंट ईयर 2020-21 साठी 26 डिसेंबरपर्यंत 4 कोटी 15 लाख इनकम टॅक्स रिटर्न फाईल झाले आहेत.

इनकम टॅक्सच्या वेबसाईटद्वारेही रिटर्न फाईल करू शकता. त्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in वर जावं लागेल. त्यानंतर युजर आयडी, पॅन, पासवर्ड, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड एंटर करून लॉगइन करा. त्यानंतर दिलेल्या प्रोसेसनुसार, आपलं रिटर्न भरा.

First published:

Tags: Income tax, SBI