इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकूनही करू नका या चुका, होईल मोठं नुकसान

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकूनही करू नका या चुका, होईल मोठं नुकसान

आर्थिक वर्ष 2018-19साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झालीय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं IT रिटर्न भरण्याचे फाॅर्मही आणलेत.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : आर्थिक वर्ष 2018-19साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झालीय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं IT रिटर्न भरण्याचे फाॅर्मही आणलेत. फाॅर्म ITR 1 आणि 4 इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. तुम्ही स्वत:च ITR भरता, तर काही चुका टाळाव्या लागतील. नाही तर मोठा दंड पडू शकतो.

योग्य माहिती द्या - इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना तुम्ही तुमच्या मिळकतीची खरी माहिती दिली नाहीत तर तुम्हाला नोटिस मिळू शकते. ITR फाॅर्ममध्ये सेव्हिंग अकाऊंट, एफडी आणि इतर गुंतवणुकींची खरी माहिती भरा. यात काही चूक झाली तर ती कर चोरी मानली जाईल.

नाव, पत्ता अचूक भरा - तुम्हाला हे माहीत नसेल की रिटर्न भरताना त्यात मोबाइल नंबर, ईमेल, बँक डिटेल्स आणि पॅन कार्ड चुकीचे भरले तरी IT डिपार्टमेंटकडून नोटिस येऊ शकते.

योग्य फाॅर्म भरला नाहीत तरी संकट - तुम्ही चुकाचा फाॅर्म भरलात तरी अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मिळकतीप्रमाणे फाॅर्म भरावा लागेल. ज्या व्यक्तींची मिळकतीचं स्रोत एकच आहे आणि मिळकत 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी ITR 1 फाॅर्म भरायला हवा. तुमची मिळकत वर्षाला 50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी ITR 2 भरायला हवा. ITR 3 फाॅर्म HUF म्हणजे हिंदू एकत्र कुटुंब भरतं. त्यात पगार, व्यवसाय, हाऊस प्राॅपर्टी आणि इतर मिळकत यांचा समावेश असतो.

व्याजाची पूर्ण माहिती द्या - काही जण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पूर्ण पगार दाखवत नाहीत. तुम्ही असं कराल तर अडचणीत याल. बँकेत मिळणारं व्याजही तुम्हाला दाखवावं लागेल.

दिलेली वेळ पाळा - तुम्ही रिटर्न भरायची वेळ पाळणं महत्त्वाचं असतं. ITRची डेडलाइनही पाळा.

VIDEO: YSR काँग्रेस आणि टीडीपीचे कार्यकर्ते भिडले

First published: April 11, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading