• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • PNB Loan Rate: सणासुदीच्या काळात PNB चं ग्राहकांना खास गिफ्ट! होम, ऑटो लोन झालं स्वस्त

PNB Loan Rate: सणासुदीच्या काळात PNB चं ग्राहकांना खास गिफ्ट! होम, ऑटो लोन झालं स्वस्त

दिवाळीच्या हंगामात (Diwali Season 2021) एखादी मोठी खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. घरं, वाहनं यांची देखील खरेदी या काळात केली जाते. दरम्यान तुम्ही देखील घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

 • Share this:
  मुंबई, 04 नोव्हेंबर: दिवाळीच्या हंगामात (Diwali Season 2021) एखादी मोठी खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. घरं, वाहनं यांची देखील खरेदी या काळात केली जाते. दरम्यान तुम्ही देखील घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण पंजाब नॅशनल बँकेने (PNB New Loan Rates) बुधवारी लोन रेटमध्ये कपात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) बुधवारी आपल्या बेंचमार्क कर्जाच्या दरात 5 बेसिस पॉईंट्सची कपात करून आता दर 6.50 टक्के करण्याची घोषणा केली. PNB ने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की 8 नोव्हेंबरपासून रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.55 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर बदलला आहे. RLLR मध्ये कपात केल्याने घर, कार, शिक्षण, वैयक्तिक कर्ज यासह सर्व कर्ज स्वस्त होतील. बँकेने याआधी 17 सप्टेंबर रोजी RLLR 6.80 टक्क्यांवरून 6.55 टक्क्यांवर केला होता. हे वाचा-कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी जोरदार होणार; 10 हजार दर मिळण्याची शक्यता पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना सुलभ कर्ज मिळण्यासाठी फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर सादर केली आहे. बँकेने गृहकर्ज, वाहन कर्ज, माय प्रॉपर्टी लोन, पेन्शन आणि गोल्ड लोन यांसारख्या सर्व प्रमुख किरकोळ उत्पादनांवरील सर्व सेवा शुल्क/प्रोसेसिंग शुल्क आणि डॉक्यूमेंटेशन फी देखील माफ केली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: