1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजावर FASTag अनिवार्य; जाणून घ्या कसा मिळवाल फास्टॅग

1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजावर FASTag अनिवार्य; जाणून घ्या कसा मिळवाल फास्टॅग

सध्या देशातील 80 टक्के टोल प्लाजावर फास्टॅग सुविधा आहे. जी सरकारला डिसेंबरच्या शेवटापर्यंत 100 टक्के करायची आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कार फास्टॅग लावला नसेल, तर हायवेवर तुमची असुविधा होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशननुसार, 1 जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. संपूर्ण देशात सरकार फास्टॅगद्वारे टोल प्लाजाकडून पैसे घेणार असून टोल प्लाजावर पैशांची देवाण-घेवाण पूर्णपणे संपुष्ठात आणणार आहे. सध्या देशातील 80 टक्के टोल प्लाजावर फास्टॅग सुविधा आहे. जी सरकारला डिसेंबरच्या शेवटापर्यंत 100 टक्के करायची आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कार फास्टॅग लावला नसेल, तर हायवेवर तुमची असुविधा होऊ शकते.

कसं काम करतो फास्टॅग -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयचा हा उपक्रम आहे. हे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन तंत्र आहे. हा एक रेडिओ फ्रीक्वेंसी टॅग आहे, जो गाडीच्या पुढच्या काचेवर लावला जातो. टोल प्लाजावरून जाताना तेथे लावलेला सेन्सर हा टॅग रीड करेल. त्यानंतर फास्टॅगशी जोडलेल्या खात्यातून पैसे कट होतील.

(वाचा - घरात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असतानाच कुटुंबात सुरू झाला अंदाधुंद गोळीबार)

कसा लावाल फास्टॅग -

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार, फास्टॅग ई-कॉमर्स वेबसाईट अमेजॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि पेटीएमवर उपलब्ध आहे. त्याशिवाय फास्टॅग बँक आणि पेट्रोल पंपवरूनही खरेदी करता येतो. ज्या बँकेत खातं आहे, त्याच बँकेतून फास्टॅग खरेदी करता येईल.

कितीला मिळेल फास्टॅग -

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार, फास्टॅग कोणत्याही बँकेतून 200 रुपयांत खरेदी करू शकता. फास्टॅग कमीत-कमी 100 रुपयांपासून रिचार्ज करू शकता. फास्टॅग खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचं रजिस्ट्रेशन, फोटो आयडीसाठी पासपोर्ट, आधार कार्ड किंवा पॅन कार्डही देऊ शकता.

Published by: Karishma Bhurke
First published: November 15, 2020, 9:48 AM IST
Tags: car

ताज्या बातम्या