जुन्या वाहनांसाठीही FASTag बंधनकारक; केंद्र सरकारने या नियमांमध्ये केला बदल

जुन्या वाहनांसाठीही FASTag बंधनकारक; केंद्र सरकारने या नियमांमध्ये केला बदल

केंद्र सरकार (Central Government) ने जुन्या वाहनांसाठी (Old Vehicles) देखील फास्टॅग लावणं बंधनकारक केलं आहे. 1 जानेवरी 2021 पासून नवा नियम लागू होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर: देशभरातील टोल नाक्यांवर डिजिटल आणि आयटी पेमेंटना चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH)ने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून जुन्या गाड्यांना देखील फास्ट टॅग लावणे बंधनकारक आहे. M आणि N कॅटेगरीमधील वाहनांनादेखील फास्टॅगचा स्टीकर लावावा लागेल. केंद्र सरकारने सेंट्रल व्हेईकल रुल्समध्ये (CMVR, 1989) बदल केले आहेत.

काय आहे मोटर व्हेईकल नियम 1989?

या नियमानुसार, 1 जानेवारी 2017 नंतर विकण्यात आलेल्या सगळ्या चारचाकी वाहनांना फास्टॅग असणं बंधनकारक होतं. त्यावेळी सगळ्या नव्या वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला होता. फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी फास्टॅग गरजेचा केला होता. तसंच गाडीला नॅशनल परमीट मिळण्यासाठीही फास्टॅग आवश्यक असेल असा नियम 1 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आला होता. आता थर्ड पार्टी इशुरन्ससाठीदेखील फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून हा निमय लागू होणार आहे. तुमच्या वाहनाला फास्टॅग लावल्यामुळे वेळेची आणि इंधनाची नक्कीच बचत होणार आहे. नवीन फास्टॅग काढण्यासाठी जास्तीत जास्त 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने फास्टॅग काढता येऊ शकतो.

फास्टॅग कसा काढायचा?

फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे. या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल. यावेळी बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे. बँकेत जाताना तुमच्या वाहनाची आरसी तुमच्यासोबत ठेवा. Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही FasTag काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसं करायचं?

जर तुम्ही FasTag बँक खात्यासोबत लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही. तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल. तुमच्या फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिजार्ज करू शकता. पण या सेवेसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतील.  महत्वाचं म्हणजे एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 7, 2020, 11:18 PM IST
Tags: Rules

ताज्या बातम्या