Home /News /money /

जिओ टॉवर्सच्या तोडफोड प्रकरणी Reliance Jio करणार हायकोर्टात याचिका

जिओ टॉवर्सच्या तोडफोड प्रकरणी Reliance Jio करणार हायकोर्टात याचिका

शेतकरी आंदोलनाचा फायदा घेणाऱ्या विघातक प्रवृत्तींवर सरकारनं तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी रिलायन्स समूहाच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) या कंपनीनं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात (Punjab and Haryana High Court) याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जानेवारी:  केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात (Agriculture reform bills) सध्या शेतकऱ्यांचं दिल्लीसह उत्तर भारतामध्ये आंदोलन (Farmers protest) सुरू आहे. या आंदोलनाचा फायदा घेऊन काही विघातक प्रवृत्तींनी रिलायन्स कंपनीच्या जिओ टॉवरची तोडफोड (vandalism of mobile towers) सुरू केली आहे. या विघातक प्रवृत्तींवर सरकारनं तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी रिलायन्स समूहाच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) या कंपनीनं  पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात (Punjab and Haryana High Court) याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या तोडफोडीमुळे कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातील कंपनीच्या संपर्क सेवांनाही याचा फटका बसला आहे. या तोडफोड करणाऱ्या मंडळींना काही जण आपल्या स्वार्थासाठी पाठिंबा देत आहेत, अशी तक्रार देखील या याचिकेत करण्यात आली आहे. ‘राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा वापर करुन रिलायन्स कंपनीच्या विरोधात खोडसाळ मोहीम राबवली जात आहे. त्यांच्या प्रचारात कोणतेही तथ्य नाही. शेतकऱ्यांसाठी सरकारनं केलेल्या कायद्याचा कंपनीशी कोणताही संबंध नाही, तसंच त्याचा कंपनीला कोणताही लाभ होणार नाही. कंपनीचे नाव खराब करणे आणि व्यवसायाला हानी पोहचवणे याच उद्देशानं ही मोहीम राबवली जात आहे,’ असं या याचिकेत रिलायन्सनं स्पष्ट केलं आहे. रिलायन्सने सोमवारी एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले आहे की, ते शेतकर्‍यांकडून थेट धान्य खरेदी करत नाही. पुरवठादार किंवा MSPच्या दराने ते शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात किंवा असे पुरवठादार जे शेतकऱ्यांकडून MSP ने धान्य खरेदी करतात अशाच पुरवठादारांकडून कंपनी धान्य खरेदी करते. कंपनीने म्हटले आहे की कमी किंमतीत दीर्घकालीन खरेदी कराराचा कंपनीने कोणताही करार शेतकऱ्यांसोबत केलेला नाही. पंजाबमध्ये ‘रिलायन्स जिओ’ च्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणात रिलायन्स कंपनीनं आपली बाजू मांडली आहे. “आमचा कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगशी काहीही संबंध नाही. त्या क्षेत्रात दाखल घेण्याची देखील आमची योजना नाही. आम्ही कधीही कॉर्पोरेट फार्मिंगसाठी शेत जमीन खरेदी केली नाही, तसंच भविष्यातही खरेदी करणार नाही.’ असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे. रिलायन्स कंपनीनं जिओ टॉवर्सच्या तोडफडीच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचं तसंच संपत्तीचं संरक्षण करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या तोडफीडीमध्ये व्यावसायिक प्रतिस्पर्धी मंडळींचा हात आहे, असंही कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Mobile, Reliance

    पुढील बातम्या