PM-Kisan योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 12 लाख शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

PM-Kisan योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 12 लाख शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

PM-kisan योजनेच्या लाभार्थीना आता Kisan credit card सहजपणे मिळू शकतात. या कार्डची मदत घेतल्यामुळे शेती करताना ते सहजपणे आपले खर्च भागवू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्डअंतर्गत(KCC) कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये शेतकरी या कार्डचा वापर करून कर्ज घेऊ शकणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा(PM-Kisan Samman Nidhi) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच किसान क्रेडिट कार्ड(KCC) देखील मिळणार आहे. केंद्र सरकारने यासाठी तयारी सुरु केली असून देशभरातील राज्यांमधील शेतकऱ्यांना याचे लवकरच वाटप केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असून या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे. यामुळे आता या शेतकऱ्यांना या कार्डचा वापर करून कर्ज घेता येणार आहे.

महाराष्ट्रात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा( PM Kisan Samman Nidhi) आतापर्यंत  अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. कृषी जागरण(Krishijagran) या वेबसाईटवर दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये जवळपास 20 लाख शेतकऱ्यांना या कार्डचा लाभ होण्याची शक्यता आहे.

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय

   शेतकऱ्यांसाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डची(KCC) योजना आणली आहे. या योजनेद्वारे कमी व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज उपलबद्ध होते. शिवाय अनेक सुविधाही मिळतात. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपुरक व्यवसायांसाठी फक्त चार टक्के व्याजाने कर्ज मिळते. पंतप्रधान किसान योजनेतील सर्व शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून केंद्र सरकारने यासाठी योजना तयार केली असून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेशी किसान क्रेडिट कार्ड (KCC) या योजनेला जोडले आहे. वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

या पद्धतीने मिळवा किसान क्रेडिट कार्ड

1)किसान क्रेडिट कार्ड (KCC) मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम pmkisan.gov.in च्या वेबसाइटवर जावे लागेल.

2)वेबसाइट उघडल्यानंतर Download KCC Form या बटन वर क्लिक करून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा.

3) हा डाउनलोड केलेला फॉर्म तुमच्या पिकाच्या तपशीलासह व जमीनीच्या कागदपत्रांसह भरा.

4) संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरा आणि कोणत्याही सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेतून किसान क्रेडिट कार्ड(KCC)चा लाभ घेतलेला नाही याचीदेखील माहिती द्यावी लागणार आहे.

या कागदपत्रांची लागणार गरज

1) किसान क्रेडिट कार्डसाठी(KCC) अर्ज करायचा असल्यास काही कागदपत्रांची गरज लागणार आहे. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट  यांपैकी एका ओळखपत्राची गरज लागणार आहे.

2)किसान क्रेडिट कार्ड तुम्ही कोणत्याही ग्रामीण बँकेतून आणि को-ऑपरेटिव्ह बँकेतून घेऊ शकता. याचबरोबर SBI, BOI आणि IDBI बँकांतून देखील हे कार्ड घेऊ शकता.

3) हे किसान क्रेडिट कार्ड भारत सरकारची संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI) जारी करते.

कोण घेऊ शकते या कार्डचा लाभ

  या कार्डचा (KCC) लाभ केवळ शेतीकर्जासाठीच उपयोगी ठरणार नाही तर अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरणार आहे. पशुपालन आणि मत्स्यपालन करण्यासाठी देखील तुम्हाला या कार्डद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. कमीतकमी 18 आणि जास्तीतजास्त 60 वर्ष वय असणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 60 वर्षांवरील वय असणाऱ्या शेतकऱ्याला सोबत दुसरा अर्जदार देखील जोडावा लागतो. त्यामुळे तुम्ही कोणताही शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी देखील या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकता.

हे देखील वाचा -  Budget 2021: सरकार अनेक गोष्टींवर कस्टम ड्यूटी हटवण्याची शक्यता, कमी होतील या वस्तूंच्या किंमती

किसान क्रेडिट कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

   किसान क्रेडिट कार्ड (KCC) मिळवण्यासाठी पॅन कार्ड(Pan Card)आधार कार्ड(Aadhar Card) आणि तुमचा फोटो लागणार आहे. याचबरोबर तुमच्या आर्थिक उत्पन्नाचा दाखल देखील लागणार आहे. कोणत्याही बँकेत तुमचे कर्ज नाही यासाठी प्रतिज्ञापत्र घेतलं जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला 2 ते 5 हजार रुपये खर्च येत होता. परंतु सरकारने सर्व बँकांना हे मोफत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क मोजण्याची गरज नाही.

Published by: Aditya Thube
First published: January 28, 2021, 11:32 PM IST

ताज्या बातम्या