Home /News /money /

Just Dial वरुन काढायचे ग्राहकाची माहिती, SBI अधिकारी बनून 200 जणांना लुटलं! 7 भामट्यांचा पर्दाफाश

Just Dial वरुन काढायचे ग्राहकाची माहिती, SBI अधिकारी बनून 200 जणांना लुटलं! 7 भामट्यांचा पर्दाफाश

क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाउंटचा तपशील कुणासह देखील शेअर करू नये, विशेषत: फोन, मेलद्वारे अशी माहिती विचारल्यास ती सांगू नये हे लोकांना वारंवार सांगितलं जातं. मात्र, तरीही लोक ऑनलाईन फसवणुकीला (Online fraud) बळी पडताना दिसून येतात. अशीच एक घटना हरयाणातून समोर आली आहे

पुढे वाचा ...
फरिदाबाद, 07 जानेवारी: आपल्या बँक, क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाउंटचा तपशील कुणासह देखील शेअर करू नये, विशेषत: फोन्स, मेलद्वारे अशी माहिती विचारल्यास ती सांगू नये हे लोकांना वारंवार सांगितलं जातं. मात्र, तरीही लोक ऑनलाईन फसवणुकीला (Online fraud) बळी पडताना दिसून येतात. हरयाणातील फरिदाबादमध्ये पोलिसांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला (Faridabad online fraud gang) अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अधिकारी असल्याची बतावणी करत ही टोळी लोकांना लुबाडत होती. विशेष म्हणजे, फसवणूक करण्यासाठी हे लोक एसबीआयच्या कस्टमर केअर क्रमांकाचा (SBI Customer care number) वापर करत होते. अशी करायचे फसवणूक पोलीस आयुक्त विकास अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने आतापर्यंत सुमारे 200 लोकांची फसवणूक केली होती. हे लोक एसबीआयच्या ग्राहकांची माहिती जस्ट डायल (Information from Just Dial used in fraud) या वेबसाईटवरून मिळवत. त्यानंतर एका ॲपच्या मदतीने ते एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांना फोन करत. या ॲपमुळे लोकांना एसबीआयच्या कस्टमर केअरवरून (SBI Customer care number used for scam) फोन आला आहे असं दिसत असे. त्यानंतर लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कार्डचा नंबर (Credit Card number), सीव्हीव्ही क्रमांक (CVV Number) आणि एक्सपायरी डेट इत्यादी माहिती त्यांच्याकडून घेतली जाई. या माहितीच्या आधारे क्रेडिट कार्डवर असणारी रक्कम आरोपी आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करुन घेत. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा-दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड, वाचा सविस्तर सात जणांना अटक हे आरोपी लोकांना जुन्या क्रेडिट कार्डची लिमिट नव्या कार्डवर ट्रान्सफर करण्याचे आमिष (SBI credit card limit scam) दाखवत होते. त्यानंतर त्यांना हवी ती माहिती मिळाली, की लोकांच्या खात्यावरील रक्कम काढून घेत होते. फरीदाबाद सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या टोळीमधील सात जणांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांच्या निर्देशांनुसार, एसीपी क्राइम सुरेंद्र श्योराण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सोनवीर, अमन, शक्ती, राहुल, पंकज, अब्दुल्ला आणि शुभान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 22 लाख रोख रक्कम जप्त त्यांच्याकडून 35 मोबाईल फोन, 109 सिम कार्ड, 15 एटीएम कार्ड, 22 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. चौकशीमध्ये आरोपींनी 17 बँक खात्यांची माहिती दिली. या खात्यांची तपासणी केली असता, त्यामधून जवळपास 1.25 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हे वाचा-Petrol Price: आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत, वाचा लेटेस्ट दर एकूणच सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आपण अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. बँकेचा कोणताही अधिकारी तुम्हाला फोनवर तुमचा पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती विचारत नाही. त्यामुळे अगदी बँकेच्या कस्टमर केअर नंबरवरून जरी फोन आला, तरी अशी माहिती कोणालाही सांगू नये.
First published:

Tags: Financial fraud, SBI, Sbi alert

पुढील बातम्या