Home /News /money /

ओमिक्रॉनच्या भीतीनं सोन्याच्या दरात घसरण, रेकॉर्ड हायच्या तुलनेत 8000 रुपयांनी स्वस्त

ओमिक्रॉनच्या भीतीनं सोन्याच्या दरात घसरण, रेकॉर्ड हायच्या तुलनेत 8000 रुपयांनी स्वस्त

जागतिक बाजारात (Global Market) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. डॉलरची स्थिती मजबूत झाल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर पाहायला मिळत आहे; मात्र कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे सोन्याच्या दरांत घसरण झाली आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 2 डिसेंबर : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटची (Omicron Variant) भीती असल्यानं भारतीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price) काहीसे कमी असल्याचं दिसत आहे. `एमसीएक्स`वर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून 47,791 रुपये (Gold Price) प्रति दहा ग्रॅम वर दिसत आहेत. मागच्या वर्षातल्या उच्चांकी (Gold record high price) 56,000 रुपयांच्या तुलनेत हे दर सुमारे 8000 रुपयांनी कमी आहेत. त्याचप्रमाणे चांदीचे फ्युचर 61,296 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहेत. जागतिक बाजारात (Global Market) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. डॉलरची स्थिती मजबूत झाल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर पाहायला मिळत आहे; मात्र कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे सोन्याच्या दरांत घसरण झाली आहे. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,780.36 डॉलर प्रति औंसवर आहे. दुसरीकडे चांदीचे व्यवहार 0.3 टक्क्यांच्या वाढीसह 22.37 डॉलर प्रति औंसच्या आसपास होत आहेत. फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल (Jerome Powell) यांनी रोखे खरेदी कार्यक्रमात तात्काळ कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर डॉलर निर्देशांक (Dollar Index) मजबूत दिसत आहे. डॉलर मजबूत झाल्यानं इतर चलनांमध्ये सोन्याचं वर्गीकरण करणं महाग झालं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सोन्यावर दिसून येत आहे. यासोबतच मदतीच्या पॅकेजमध्ये कपात आणि व्याजदरात वाढ झाल्यामुळे सरकारी रोखे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्याजाचा आधार मिळत नसल्यानं सोन्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट वाढताना दिसत आहे. Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर `कोटक सिक्युरिटी`चे रवींद्र राव यांच्या म्हणण्यानुसार, `सोनं प्रतिऔंस 1800 डॉलरवर राहण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटशी संबंधित चिंतेमुळे सोन्याचे दर सुरक्षित होताना दिसत असले तरी दुसरीकडे `फेड`कडून आर्थिक धोरणं कडक होण्याची शक्यता असल्यानं सोन्यावरचा दबाव वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळेल.` ओमिक्रॉनमुळं निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ईटीएफ गुंतवणूकदार (ETF Investors) काहीसे बाजूला गेल्याचं दिसत आहे. सोन्यावर आधारित दुसरा सर्वांत मोठा एक्स्चेंज ट्रेडेड फंड असलेल्या एसपीडीआर गोल्ड ट्रस्टनं सांगितलं, की त्यांचं होल्डिंग मंगळवारच्या (30 नोव्हेंबर) होल्डिंगच्या तुलनेत बुधवारी 0.2 टक्क्यांनी घसरून 990.82 टन झाली आहे`. Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख माय गोल्ड कार्टचे (My Gold Kart) विदित गर्ग यांनी सांगितलं, की `यूएस फेडच्या अध्यक्षांनी चलनवाढीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोन्याचे भाव गडगडताना दिसत आहेत. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं, तर सोन्याचे दर त्याच्या सर्व मूव्हींग अॅव्हरेजच्या खाली दिसत आहेत. यामुळे सोन्याच्या दरावर आणखी दबाव येण्याचे संकेत मिळत आहेत. सोन्याचे दर 1803 डॉलरच्या वर क्लोजिंग झाले, तर त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.`
First published:

Tags: Corona, Gold and silver, Gold prices today

पुढील बातम्या