मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पुन्हा स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या ताजे दर

पुन्हा स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या ताजे दर

भारतीय बाजारात (Indian Market) सोन्याच्या दरात (Gold rates) पुन्हा एकदा घसरण (Fall) झाली असून दर कमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसून आलं आहे.

भारतीय बाजारात (Indian Market) सोन्याच्या दरात (Gold rates) पुन्हा एकदा घसरण (Fall) झाली असून दर कमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसून आलं आहे.

भारतीय बाजारात (Indian Market) सोन्याच्या दरात (Gold rates) पुन्हा एकदा घसरण (Fall) झाली असून दर कमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसून आलं आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 14 सप्टेंबर : भारतीय बाजारात (Indian Market) सोन्याच्या दरात (Gold rates) पुन्हा एकदा घसरण (Fall) झाली असून दर कमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसून आलं आहे. सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली, तरी चांदीच्या (Silver) किंमतीत मात्र काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. मात्र ही किरकोळ वाढ असून चांदीचा प्रतिकिलोचा दर अजूनही 62 हजारांच्या खालीच आहे.

असा आहे ताजा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 36 रुपयांनी घसरून ते 45,888 रुपयांवर स्थिरावले आहेत. सोमवारी हे दर 45,924 रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसऱण नोंदवण्यात आली असून हा दर प्रति औंस 1788 डॉलरवर आला आहे.

चांदीच्या किंमतीत वाढ

चांदीच्या किंमतीत काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. 73 रुपये प्रति किलोच्या वाढीसह चांदीचा दर 61,838 वरून 61,911 एवढा नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चांदीच्या दरात कुठलाही बदल झाला नसून चांदी 23.68 डॉलर प्रति किलोने विकली जात आहे.

सोन्यातील पडझडीची कारणे

जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा होत असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याचांदीतील गुंतवणूक काढून ती शेअर बाजारात गुंतवत असल्यामुळेच ही घसऱण सुरु असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. कोरोना काळात जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था गडगडली होती. त्यात आता गेल्या काही आठवड्यांपासून सुधारणा होत असून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पुन्हा गुंतवणूक करायला सुरुवात केल्याचं हे लक्षण मानलं जात आहे.

हे वाचा - ISI आणि ISKP ची छुपी युती, पाकिस्तानकडून तालिबानच्याही पाठीत खंजीर

गुंतवणुकीसाठी योग्य वेळ

सोन्याच्या दरात घसरण होत असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर मानली जाते. ज्यांना कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांनी सध्या वाट पाहावी, मात्र ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी ही योग्य संधी असल्याचं गुंतवणूक तज्ज्ञांचं मत आहे.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today