मुंबई, 25 डिसेंबर : डिजिटल पेमेंट अॅप Paytm, Phonepe, Google Pay यांसारख्या डिजिटल ट्रान्झॅक्शन अॅप्सचा वापर गेल्या काही वर्षांत बराच वाढला आहे. कोरोना महामारीनंतर डिजिटल पेमेंट अधिक लोकप्रिय झाले आहे. चहाच्या दुकानावरही 5 रुपयांचं बिलही लोक मोबाईलद्वारे देतात. मात्र सायबर गुन्हेगारही या सुविधेचा मोठा गैरफायदा घेत आहेत.
डिजिटल व्यवहारांच्या जगात जशी सुविधा वाढत आहेत, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. दिल्लीतच 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली एका महिलेची 8.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आली होती. सायबर ठगांनी महिलेच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून 'केबीसी'च्या लकी ड्रॉमध्ये निवडून 25 लाख जिंकल्याचा बहाणा केला. चार दिवसांत गुंडांनी महिलेची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केली.
बनावट पेटीएम अॅप
बनावट अॅप्सच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. अलीकडेच, बनावट पेटीएम अॅपची घटना समोर आली आहे, ज्याद्वारे सायबर गुन्हेगारांनी लोकांकडून लाखो रुपये लुटले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद पोलिसांनी बनावट पेटीएम अॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या काही लोकांना अटक केली आहे. हे बनावट अॅप्स खऱ्या अॅपसारखे दिसतात, ज्यामुळे लोक फसतात.
'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर
हैदराबादप्रमाणेच देशाच्या इतर भागांतूनही फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, ऑनलाइन व्यवहार करताना नेहमी सतर्क राहणे आणि कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. केवायसीच्या नावावरही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.
Paytm अॅपशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात दुकानातून एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची रक्कम, दुकानाचे किंवा दुकानदाराचे नाव व इतर माहितीसह बनावट पावत्या दाखवून दुकानदाराला लुटले जात आहे. हे बनावट अॅप दुकानदाराला पैसे मिळाल्याची सूचनाही दाखवते, पण त्यांच्या बँक खात्यात काहीही जमा होत नाही.
Secured आणि Unsecured क्रेडिट कार्डमध्ये फरक काय? कोणतं कार्ड ठरेल फायदेशीर?
बनावट अॅप्स टाळा
पेमेंट अॅप्सच्या नावासारखे अनेक बनावट अॅप प्ले स्टोअरमध्ये आले आहेत. या अॅप्सच्या नोटिफिकेशन्स खूप वेगाने आणि सतत येत राहतात, त्यामुळे ते फेक अॅप्स डाउनलोड करण्यापूर्वी तपासणे खूप महत्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online payments, Paytm