विजय वंजारा प्रतिनिधी मुंबई : तुमच्याकडे असलेली नोट बनावट तर नाही ना याची एकदा खात्री करून घ्या. कारण बनावट नोटांचा सुळसुळाट पसरत आहे. पुन्हा एकदा पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी कारवाई केली असून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 19 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिसांनी पुन्हा एकदा बनावट नोट प्रकरणाची उघड केली. 19 लाख रोख रक्कम बनावट नोट आहे. बनावट नोट प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. फहील इरफान शेख़ 21 वर्षे, आणि मेहबूब नबीसाब शेख वय 23 अशे दोन अटक आरोपीचे नावं आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमालामध्ये 2000 रुपयांच्या 500 च्या 1796, 200 रुपये दराच्या 05 आणि 100 रुपये दराच्या 05 बनावट नोटा आहेत. पोलिसांनी सापळा रचून ह्या दोघांचं बिंग फोडलं. मालवणी पोलीस ठाणे भा द वी कलम 489 (अ) 489 (ब), 489 (क), 489 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Gold Smuggling : अंतर्वस्त्रामध्ये 56 लाखांचं लपवलं सोनं, पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं लावला छडा
500 किंवा 2 हजार रुपयाची नोट तुम्ही लाईट समोर पकडली तर तुम्हाला 500 रुपये लिहिलेलं दिसेल.
- डोळ्यासमोर 45 डिग्रीमध्ये नोट पकडली तर तुम्हाला 500 रुपये लिहिलेलं दिसेल
देवनागरीमध्ये 500 किंवा 2000 रुपये लिहिलेलं असेल
- महात्मा गांधी यांचा फोटो एकदम सेंटरमध्ये दिसेल
- भारत आणि India लेटर्स लिहिलेले दिसतील
- जर तुम्ही ही नोट हलक्या हाताने दुमडली तर सिक्युरिटी थ्रीडीच्या रंगाचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसेल
- वर्नर सिग्नेचर, गॅरेंटी क्लॉज, मिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला देण्यात आला आहे
- महात्मा गांधीजींचा फोटो तुम्हाला पलिकडच्या बाजूला वॉटरमार्कमध्ये छापलेला दिसेल
- नोटेच्या वर डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूने नंबर वाढताना दिसतात
- ५०० रुपयांच्या नोटेवर रंगही बदलतो
- याशिवाय उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे
- उजव्या बाजूला सर्कल बॉक्स आहे ज्यामध्ये 500 लिहिलेलं आहे. राइट आणि लेफ्ट साइडला 5 ब्लीड लाइन्स आहेत
- नोटेच्या छपाईचे वर्ष लिहिले आहे.
- स्वच्छ भारताचा लोगो घोषवाक्यासह छापलेला आहे.
- मध्य बाजूला भाषेचे पॅनेल आहे.
भारतीय ध्वज असलेल्या लाल किल्ल्याची चित्र प्रिंट आहे.
- देवनागरीच्या 500 प्रिंट आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Mumbai, Republic Day 2023