मराठी बातम्या /बातम्या /मनी /1000 रुपयाची नवी नोट बाजारात? जाणून घ्या काय आहे सत्य

1000 रुपयाची नवी नोट बाजारात? जाणून घ्या काय आहे सत्य

1000 रुपयांची नवी नोट बाजारात आल्याचं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

1000 रुपयांची नवी नोट बाजारात आल्याचं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

1000 रुपयांची नवी नोट बाजारात आल्याचं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

नवी दिल्ली, 04 मार्च :  नोटबंदीनंतर बनावट नोटांवर आळा घातला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र बनावट नोटांमुळे फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आजही समोर येत आहेत. सध्या अशीच एक बनावट नोट बाजारात आल्याचं बोललं जात आहे. 1000 रुपयांची नवी नोट बाजारात आल्याचं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून अशी कोणतीच नोट जारी करण्यात आलेली नाही. सोशल मीडिया किंवा व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीमधून अशा अफवांना खतपाणी घालण्यात येत आहे की, 1000 रुपयांची नोट जारी करण्यात आली आहे. PIB Fact Check ने ही बाब खोटी असल्याचं जाहीर केलं आहे.

PIB Fact Check ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून अशी माहिती दिली आहे, सोशल मीडियावर अशी अफवा पसरवण्यात येत आहे की 1000 रुपयाची नवी नोट बाजारात आली आहे. या नोटेचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे.

PIB Fact Check ने केलेल्या तपासानुसार 1000 च्या नोटेबाबत जी माहिती आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो बनावट आहे. RBI कडून अधिकृत अशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

(हे वाचा- PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, ग्राहकांच्या खात्यावर होणार हे परिणाम)

PIB Fact Check केंद्र सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रलयाबाबत चुकीच्या सूचना पसरू नयेत याबाबत खबरदारी घेण्याचं काम करते. सरकार संबंधित कोणती माहिती खरी कोणती खोटी हे जाणून घेण्यासाठी PIB Fact Check एक पर्याय आहे. PIB Fact Check कडे संशयात्मक वाटणारी माहिती तुम्ही स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा 918799711259 या व्हाट्सअॅप नंबरवर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com वर मेल करूनही तुम्ही सत्य पडताळणी करू शकता.

अन्य बातम्या

मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा खेळणार नाहीत होळी

भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर

अशा पोहोचल्या संसदेत खासदार नवनीत राणा...

First published: