Home /News /money /

'तुमचं बँक अकाऊंट बंद करण्यात आलंय', तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर 'हे' चुकूनही करु नका

'तुमचं बँक अकाऊंट बंद करण्यात आलंय', तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर 'हे' चुकूनही करु नका

SBI च्या अनेक ग्राहकांना सायबर क्राईम करणारे लोक मेसेज पाठवत आहेत. तुमच्या कागदपत्रांची मुदत संपल्यामुळे तुमचे खाते बंद करण्यात आल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.

    मुंबई, 3 मे : तुम्ही SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral Massage) होत आहे. एसबीआयच्या अनेक ग्राहकांनाही हा मेसेज पाठवला जात आहे. व्हायरल मेसेज फेक असून तो लोकांना फसवण्यासाठी व्हायरल केला जात आहे. मेसेजमध्ये काय म्हटलं आहे? SBI च्या अनेक ग्राहकांना (SBI Customers) सायबर क्राईम (Cyber Crime) करणारे लोक मेसेज पाठवत आहेत. तुमच्या कागदपत्रांची मुदत संपल्यामुळे तुमचे खाते बंद करण्यात आल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. खाते पुन्हा उघडण्यासाठी, तुम्हाला दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि तुमचे तपशील सबमिट करावे लागतील. हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार पीआयबी फॅक्ट चेककडून मेसेजची पडताळणी पीआयबीच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने या मेसेजची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणावर, पीआयबी फॅक्ट चेक टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून माहिती दिली आहे की स्टेट बँक आपल्या ग्राहकांना असे संदेश पाठवत नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे आणि अशा मेसेज आणि मेलला रिप्लाय देऊ नका. या लिंकवर क्लिक करून तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. सोनं बनावट किंवा भेसळयुक्त असल्यास कसं ओळखायचं? घरबसल्या 'हे' उपाय करा मेसेज आल्यावर कुठे तक्रार करावी? पीआयबी फॅक्ट चेक टीमने लोकांना अशा मेसेजला बळी पडू नका असा सल्ला दिला आहे. असा काही मेसेज आल्यास कळवा. याबाबत तक्रार करण्यासाठी तुम्ही report.phishing@sbi.co.in वर मेल करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank details, Online fraud, SBI

    पुढील बातम्या