Home /News /money /

Fact Check: सरकारशी संबंधित व्हायरल माहिती खरी की खोटी, कशी चेक कराल?

Fact Check: सरकारशी संबंधित व्हायरल माहिती खरी की खोटी, कशी चेक कराल?

तुम्ही जर सोशल मीडियावर एखादी सरकारी माहिती पाहिली आणि त्याबद्दल तुम्हाला संशय आला तर तुम्ही देखील त्याची पडताळणी करण्यासाठी PIB Fact check ला कळवू शकता.

    मुंबई, 24 एप्रिल : इंटरनेटमुळे एखादा गोष्ट कधी व्हायरस (Viral Massage) होईल याचं काही सांगता येत नाही. कमी वेळी जास्त प्रसार करण्याची ताकद इंटरनेटमुळे निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) माहिती कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. मात्र कधी कधी माहिती खरी की खोटी हे देखील तपासलं जात नाहीत. त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. गेल्या काही काळात सरकारचे निर्णय, योजना किंवा इतर गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडून व्हायरल केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे खबरदारी म्हणून सरकार चुकीच्या व्हायरल कंटेट फॅक्ट चेक (Fact Check) करुन लोकांपुढे मांडत आहे. तुम्ही जर सोशल मीडियावर एखादी सरकारी माहिती पाहिली आणि त्याबद्दल तुम्हाला संशय आला तर तुम्ही देखील त्याची पडताळणी करण्यासाठी PIB Fact check ला कळवू शकता. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. PIB फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या धोरणे/योजना/विभाग/मंत्रालयांबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. कोणीही संशयास्पद बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा URL 918799711259 WhatsApp क्रमांकावर PIB Fact Check वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो. खाद्य तेलामुळे घराचं बजेड बिघडणार? तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; काय आहेत कारणे काही दिवसांपूर्वी भारतीय पोस्ट खात्याचा (Indian Post Office) बनावट लकी ड्रॉ (Lucky Draw) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये लोकांना वैयक्तिक तपशील शेअर करण्याच्या बदल्यात 6000 रुपये जिंकण्याची ऑफर दिली जात होती. हा लकी ड्रॉ इंडिया पोस्टद्वारे काढला जात असल्याचा दावा केला जात आहे. पण यात काहीही तथ्य नसून भारतीय पोस्टने असा कोणताही लकी ड्रॉ आयोजित केलेला नाही. त्यामुळे खोट्या लकी ड्रॉला बळी पडू नका. कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल PIB फॅक्ट चेकने लकी ड्रॉवर बनावट अलर्ट जारी केला आहे. PIB फॅक्ट चेक म्हणते की हा घोटाळा आहे आणि त्याचा भारतीय पोस्टशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्हालाही इंडियन पोस्टच्या लकी ड्रॉच्या नावाने मेसेज आला तर त्यात अडकून तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Internet, Online, Social media viral

    पुढील बातम्या