मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Fact Check: 5 लाख विद्यार्थ्यांना फ्री मिळतोय Laptop? Viral मेसेज मागचं जाणून घ्या सत्य

Fact Check: 5 लाख विद्यार्थ्यांना फ्री मिळतोय Laptop? Viral मेसेज मागचं जाणून घ्या सत्य

तुम्हाला आलाय का मुलांना फ्री लॅपटॉप देणार असा मेसेज, मग जाणून घ्या काय आहे सत्य?

तुम्हाला आलाय का मुलांना फ्री लॅपटॉप देणार असा मेसेज, मग जाणून घ्या काय आहे सत्य?

तुम्हाला आलाय का मुलांना फ्री लॅपटॉप देणार असा मेसेज, मग जाणून घ्या काय आहे सत्य?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : सोशल मीडियावर एक मेसेज सध्या खूप व्हायरल होत आहे. शिक्षण मंत्रालयाकडून देशातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. असे मेसेज आपण सत्यता न पडताळता अनेकदा पुढे पाठवून देतो. मात्र त्या मेसेजचं सत्य समोर आलं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

देशातील ५ लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत दिले असल्याची चर्चा आहे. त्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर अर्ज केल्यावर लॅपटॉप मिळत असल्याचा दावा केला जात आहे. हा मेसेज तुफान व्हायरल झाल्यानंतर याबाबत PIB कडून या मेसेजबाबत फॅक्ट चेक करण्यात आलं.

PIB ने ट्वीट करून हा मेसेज फेक असल्याचा सांगितला आहे. अशा प्रकारचे कोणतेही निवेदन सरकारकडून देण्यात आलं नाही. अशा कोणत्याही आलेल्या मेसेजवर जाऊन क्लीक करू नये. ही लिंक फेक असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना आणण्यात आली नाही.

अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं PIB कडून सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या मेसेजद्वारे फसवणूक देखील केली जाऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.

सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी तुमच्यापर्यंत जर आली असेल तर त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत देखील घेऊ शकता. कोणीही PIB FactCheck या व्हॉट्सअॅप क्रमांक ९१८७९९७११२५९ वर किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकता असं सांगण्यात आलं आहे.

First published: