Facebook Pay : WhatsApp, Messenger आणि Instagram ने करता येणार पेमेंट

Facebook Pay : WhatsApp, Messenger आणि Instagram ने करता येणार पेमेंट

फेसबुकने (facebook unified payment serive)फेसबुक पे ही पेमेंट सर्व्हिस लाँच केली आहे. आता फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरच्या माध्यमातून हे पेमेंट करता येईल.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : फेसबुकने (facebook unified payment serive)फेसबुक पे ही पेमेंट सर्व्हिस लाँच केली आहे. आता फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरच्या माध्यमातून हे पेमेंट करता येईल.या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी युजर्सना सिक्युरिटी ऑप्शन्स दिले जातील. यामध्ये PIN आणि बायोमेट्रिकसारखी सुविधा मिळेल. या पेमेंट सिस्टीममध्ये शॉपिंग, गेम पर्चेस, इव्हेंटचं तिकीट बुकींग, डोनेशन यासोबतच पैसे ट्रान्सफर करण्याचीही सोय असेल.

फेसबुकने ही सेवा अमेरिकेत लाँच केली आहे. Facebook Pay कोणत्याही व्यवहारांसाठी सिंगल सिस्टीम उपलब्ध करून देईल. यामुळे युजरचा डेटा सुरक्षित राहील.

(हेही वाचा :  सोनं आणि चांदीला पुन्हा झळाळी, हे आहेत आजचे दर)

फेसबुक पे काही प्रमुख डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डसाठी असेल. यात PayPal ही आहे. सुरुवातीला ही युनिफाइड पेमेंट सर्व्हिस Facebook आणि Messenger वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फेसबुकने नुकताच पेरेंट कंपनी म्हणून वेगळा लोगो लाँच केला आहे. पेरेंट कंपनीचा हा लोगो फेसबुक अ‍ॅपच्या लोगोपेक्षा वेगळा असेल.

या नव्या लोगोमध्ये सगळी अक्षरं FACEBOOK अशी कॅपिटल आहेत. जर तुम्ही फेसबुक मेसेंजर अ‍ॅपचा लोगो पाहिलात तर हेच छोट्या अक्षरांमध्ये, facebook असं लिहिलं आहे.

======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या