Facebook Fuel for India LIVE: भारतात होणार मोठी गुंतवणूक? आज मुकेश अंबानी आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात चर्चा

Facebook Fuel for India LIVE: भारतात होणार मोठी गुंतवणूक? आज मुकेश अंबानी आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात चर्चा

Facebook Fuel for India 2020: या कार्यक्रमामध्ये फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी संवाद साधणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: सोशल मीडिया जायंट फेसबुकने (Facebook) आज फ्युएल फॉर इंडिया 2020 (Facebook Fuel for India 2020) हा इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग (Facebook chief Mark Zuckerberg) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारतातील व्यवसायाच्या संधी या विषयावर चर्चा करणार आहेत. इव्हेंटची सुरुवात सकाळी 9:30 वाजता झाली आहे. दोन दिवस हा कार्यक्रम होणार असून 16 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचे शेवटचे सेशन असेल. भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी डिजिटलीकरण (Digitization) आणि लहान उद्योगांची त्यातील भूमिका या विषयावर मार्क झुकेरबर्ग आणि मुकेश अंबानी चर्चा करणार आहेत.

फ्यूएल फॉर इंडियामध्ये फेसबुकचे ग्लोबल आंतरराष्ट्रीय विषयांचे आणि कम्यूनिकेशन डिपार्टमेंटचे व्हाइस प्रेसिडेंट निक क्लेग यांनी देखील संबोधित केले. फेसबुकचे चीफ रेवेन्यू ऑफिसर डेविड फिशर यांनी या कार्यक्रमात संबोधित केले आहे. भारतात खूप संधी असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. फिशर यांनी असे म्हटले आहे की, 'मीशो आणि अनअकॅडमी सारख्या कंपन्यांमध्ये फेसबूकने अल्प गुंतवुणूक केली आहे असा एकमेव देश म्हणजे भारत आहे. संशोधनाला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. फेसबुकला भारतात दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे. आपलं ऑनलाइन अस्तित्व जाणवावं आणि त्यात वाढ व्हायला मदत व्हावी यासाठी फेसबुक सतत व्यवसायांसाठी उपयुक्त अशी नवी सोल्युशन सादर करत असतं.’

फेसबुकसाठी भारत का आहे महत्त्वाचा?

फिशर यांनी याआधी अशी माहिती दिली होती की, 'फेसबुकने भारतात गुंतवणूक करताना काही असे करार केले जे त्यांनी जगभरात कुठेही केलेले नाहीत. भारतात होणारं संशोधन आणि त्यामुळे तिथल्या जीवनशैलीत होणारे बदल त्यांचा परिणाम याची जाणीव फेसबुकला असून हीच गोष्ट फेसबुकला भारताची खासियत वाटते. त्यामुळेच आम्ही भारतात विशेष गुंतवणूक केली आहे. आम्ही भारतासाठी एक विशेष स्ट्रक्चर विकसित केलं आहे. जे आम्ही जगभरात केलं नाही ते आम्ही भारतात करणार आहोत. इथं आम्ही विशेष गुंतवणूक आणि करार करत आहोत.’

एप्रिल महिन्यात फेसबुकने जिओमध्ये केली होती 5.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक

एप्रिल महिन्यात फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5.7 अब्ज डॉलर म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबद्दल फेसबुकला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9.9 टक्के भागीदारी देण्यात आली. फेसबुकने 2014 नंतर केलेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे.

सिल्वर लेक पार्टनरनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 1.15 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचं जाहीर केलं होतं. नंतर सिल्वर लेकनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अतिरिक्त 4,546.80 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचंही जाहीर केलं. आता त्यांची कंपनीतील भागीदारी 2.08 टक्के होईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 15, 2020, 12:07 PM IST

ताज्या बातम्या