भारत जगातल्या पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचणार - मुकेश अंबानी

मुकेश अंबानी यांनी मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं की, 'Jio ने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटसह व्हॉट्सअ‍ॅप पेचा समावेश झाल्याने डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

मुकेश अंबानी यांनी मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं की, 'Jio ने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटसह व्हॉट्सअ‍ॅप पेचा समावेश झाल्याने डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी Facebook Fuel for India 2020 मध्ये म्हणाले, 'भारतात अनेक कंपन्या आणि संघटना डिजीटल इनक्ल्यूजन (समावेश) च्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. भारतातल्या तरुणांची डिजीटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारताचे तरुण रोल मॉडेल म्हणून बघतात.' मुकेश अंबानी यांनी मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं की, 'Jio ने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटसह व्हॉट्सअ‍ॅप पेचा समावेश झाल्याने डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओमार्ट भारतातील प्रत्येकाला जागतिक सेवांमध्ये भाग घेण्याची संधी देत आहे.' कोरोना महामारी संपल्यानंतर तंत्रज्ञानाची भूमिका काय असेल? असा प्रश्न झुकेरबर्ग यांनी मुकेश अंबानींना विचारला. त्यावर उत्तर देताना अंबानी यांनी, भारताच्या डिजिटल कामगिरीचं श्रेय पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया कँपेनला दिलं. तसंच इतिहासातील भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एफडीआयसाठी आणि भारतातील फेसबुक-जिओ भागीदारीबद्दल त्यांनी झुकेरबर्ग यांचे आभार मानले आहेत. Facebook Fuel for India 2020 या कार्यक्रमात रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग संवाद साधत होते. मुकेश अंबानी यांनी यावेळी असं म्हटलं की, भारतामध्ये अनेक कंपन्या आणि संघटन डिजिटल इन्क्लूजनच्या दिशेने तेजीने काम करत आहेत. भारतातील तरुणांची डिजिटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याकडे भारतातील तरुण रोल मॉडेल म्हणून पाहतात.' या कार्यक्रमात आकाश अंबानी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, Jio इकोसिस्टिममध्ये 400 मिलियन लोकांना जोडण्याचे आणि 12 फर्स्ट पार्टी Apps सादर करण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून सर्वांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध केल्या जातील. दरम्यान Facebook Fuel for India 2020 मध्ये इशा अंबानी असं म्हणाल्या की, रिलायन्स जिओ आल्यानंतर भारताने सर्वाधिक गुणवत्तेची प्रगती केली आहे. आपल्या नवीन पिढीच्या समाजासाठी जिओ 'डिजिटल एनेबलर' च्या स्वरुपात भूमिका बजावत आहे. फेसबुकसाठी भारत का आहे महत्त्वाचा? फिशर यांनी याआधी अशी माहिती दिली होती की, 'फेसबुकने भारतात गुंतवणूक करताना काही असे करार केले जे त्यांनी जगभरात कुठेही केलेले नाहीत. भारतात होणारं संशोधन आणि त्यामुळे तिथल्या जीवनशैलीत होणारे बदल त्यांचा परिणाम याची जाणीव फेसबुकला असून हीच गोष्ट फेसबुकला भारताची खासियत वाटते. त्यामुळेच आम्ही भारतात विशेष गुंतवणूक केली आहे. आम्ही भारतासाठी एक विशेष स्ट्रक्चर विकसित केलं आहे. जे आम्ही जगभरात केलं नाही ते आम्ही भारतात करणार आहोत. इथं आम्ही विशेष गुंतवणूक आणि करार करत आहोत.’ एप्रिल महिन्यात फेसबुकने जिओमध्ये केली होती 5.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक एप्रिल महिन्यात फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5.7 अब्ज डॉलर म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबद्दल फेसबुकला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9.9 टक्के भागीदारी देण्यात आली. फेसबुकने 2014 नंतर केलेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. सिल्वर लेक पार्टनरनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 1.15 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचं जाहीर केलं होतं. नंतर सिल्वर लेकनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अतिरिक्त 4,546.80 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचंही जाहीर केलं. आता त्यांची कंपनीतील भागीदारी 2.08 टक्के होईल.
    First published: