Home /News /money /

'आई आजारी आहे, मदत करा',Facebook वर फेक अकाउंट बनवून तरुणाला घातला गंडा

'आई आजारी आहे, मदत करा',Facebook वर फेक अकाउंट बनवून तरुणाला घातला गंडा

फेसबुकवर कुणी मदतीचं आवाहन करत असेल तर त्याचं अकाउंट अधिकृत आहे की नाही याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. जबलपूरच्या एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी अशाच प्रकारे गंडा घातला.

    प्रतीक अवस्थी जबलपूर, 20 नोव्हेंबर :  फेसबुकवर कुणी मदतीचं आवाहन करत असेल तर त्याचं अकाउंट अधिकृत आहे की नाही याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. जबलपूरच्या एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी अशाच प्रकारे गंडा घातला. मूळचा जबलपूरचा असलेला पलाश जैन सध्या अमेरिकेत आहे. या सायबर ठगांनी पलाशच्या मित्राच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट बनवलं आणि पलाशच्या मित्राची आई आजारी असल्याचा बहाणा केला. मित्राची आई आजारी आहे हे कळल्यावर पलाश भावुक झाला आणि त्याने लगेचच 3 हजार डॉलर म्हणजेच सव्वा लाख रुपये ट्रान्सफर केले. पण त्यानंतर मित्राशी बोलणं झाल्यानंतर पलाशला आपण फसवलो गेल्याचं कळून चुकलं. मित्राचं फेसबुक अकाउंट पलाशचे वडिल अजय जैन यांनी आता याविरोधात स्टेट सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. पलाशचा अनुराग पांडेय नावाचा एक मित्र आहे. या सायबर ठगांनी अनुरागच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट बनवलं. अनुरागची आई आजारी आहे, असं लिहून पलाशकडे मदत मागितली. अनुरागच्या फेसबुक अकाउंटमध्ये ज्या बँकेचा अकाउंट नंबर दिला होता ती फरिदाबादची कोटक महिंद्रा बँक आहे. पलाशने याच खात्यात 3 हजार डॉलर्स रुपये ट्रान्सफर केले. (हेही वाचा : 1 जानेवारीपासून बदलणार सोनं खरेदीचा नियम, सरकारने दिली मंजुरी) या फसवणुकीपासून सावधान या सगळ्या प्रकरणावरून धडा घ्यायला हवा. कोणीही भावनिक आवाहन केलं तरी व्हर्चुअल नेटवर्कच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू नका, असं आवाहन सायबर सेलच्या पोलिसांनी केलं आहे. पलाशने जर मित्राशी फोनवर बोलणं केलं असतं तर तो अशा फसवणुकीची शिकार झाला नसता, हेही पोलिसांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. =======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Facebook, Money

    पुढील बातम्या