Home /News /money /

डोळे दाखवा आणि पेमेंट करा, अशी असेल देशाची नवी पेमेंट सिस्टम

डोळे दाखवा आणि पेमेंट करा, अशी असेल देशाची नवी पेमेंट सिस्टम

आता पेमेंट करण्यासाठी तासंतास थांबण्याची गरज नाही, भारतात लवकरच येणार नवीन पेमेंट टेक्नोलॉजी

    मुंबई, 21 फेब्रुवारी : आतापर्यंत कार्ड दाखवून शॉपिंग करता येत होता आता चेहरा दाखवून हवी तेवढी खरेदी करता येणार आहे. आता आपल्या कार्डची गरज नाही आपण चेहरा दाखवून खरेदी करा असे जर दुकानांबाहेर फलक लागले तर आश्चर्य वाटायला नको. त्याचं कारण म्हणजे RBIने नवीन पेमेंट सिस्टिम लाँच करण्याच्या तयारीत आहे. या सिस्टिमचं वैशिष्ट्यं हेच असणार आहे की तुम्हाला आता तासंतास रांगेत उभं राहावं लागणार नाही. खरेदी केल्यानंतर केवळ आपला चेहरा दाखवून घरी जाऊ शकता. आपल्या खात्यातून खरेदी केलेल्या वस्तुंचे पैसे वजा होणार आहेत. या पेमेंट सिस्टिमवर सध्या आरबीआयकडून काम सुरू आहे. भारतात ही सिस्टिम सुरक्षितपणे लाँच करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. लवकरच ही सिस्टीम सर्वत्र सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Facial Recognition Technology) फेशियर रेकग्निशन टेक्नोलॉजी असं या सिस्टिमचं नाव आहे. ही सिस्टिम एटीएमसाठीही वापरण्यात येणार असल्य़ाचं सांगितलं जात आहे. चेहरा दाखवून कसं होणार पेमेंट पेमेंटचे अनेक पर्याय आहेत मात्र त्यातील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये Facial Recognition Payment टेक्नोलॉजी सर्वाधिक वापरली जाते. आपला चेहरा हीच पेमेंट करण्याची सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. शंभरहून अधिक शहरांमध्ये सध्या ही सेवा वापरली जात आहे. कॅमरासोबत कनेक्ट असलेल्या POS मशीन समोर उभं राहिल्यानंतर आपला चेहरा स्कॅन होतो. यासाठी आधी बँकेत आपल्याला अकाऊंटसोबत फेस स्कॅन करावा लागतो. त्यानंतर ही पुढची प्रोसेस करता येते. दिल्ली आणि हैदराबादमध्ये ही टेक्नोलोजी प्रायोगिक तत्वावर नागरिकांना वापरण्यास सांगितलं आहे. त्यानंतर देशभरात लागू करण्यात येणार असल्याचं RBIकडून सांगण्यात आलं आहे. बायोमेट्रिक सॉफ्टवेअरच्या आधारे फेस रेकग्निशन केलं जातं आणि त्याद्वारे प्रत्येक चेहऱ्यानुसार सिस्टीममध्ये अलगोरिदम तयार करण्यात येतो. या अलगोरिदमच्या आधारे आपण आपला चेहरा दाखवला की पेमेंट होऊ शकतं ही प्रमाली तयार करण्यात आली आहे. जर आपण थम केलं की अटेंडन्स लागतो तशाच पद्धतीची ही यंत्रणा फेसद्वारे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हेही वाचा-100 तरुणींची कपडे काढून केली टेस्ट, महापालिकेत घडला धक्कादायक प्रकार हेही वाचा-पुणे: पतीने घेतला पत्नीच्या मनगटाचा चावा, कोर्टाने दिली घटस्फोटाला मंजूरी
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Digital payment, Money, Online payment, Payment, Techonology

    पुढील बातम्या