Home /News /money /

New IPO : FabIndia 4000 कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत; SEBI कडे कागदपत्रे दाखल

New IPO : FabIndia 4000 कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत; SEBI कडे कागदपत्रे दाखल

IPO च्या माध्यमातून सुमारे 4000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी FabIndia कंपनीने शनिवारी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) अर्ज केला.

    मुंबई, 20 डिंसेबर : पारंपारिक कपडे, होम डेकोर आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्सशी संबंधित फॅबइंडिया (Fabindia) ही कंपनीही शेअर बाजारात एन्ट्री करणार आहे. फॅब इंडिया लवकरच आपली इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लाँच करणार आहे. या IPO च्या माध्यमातून सुमारे 4000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनीने शनिवारी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) अर्ज केला. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP च्या मसुद्यानुसार, या ऑफरमध्ये 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय फॅब इंडिया 2,50,50,543 जुन्या शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for sale) करेल. FabIndia कारागीर आणि शेतकऱ्यांना 7 लाख शेअर्स भेट देणार बाजारातील सूत्रांनी सांगितले की, कंपनीला या IPO मधून 4,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या व्यवसायाशी जवळचे संबंध असलेल्या कारागीर आणि शेतकऱ्यांना कंपनीच्या प्रमोटर्स 7 लाख शेअर्स भेट देण्याचीही योजना आहे. कंपनी किंवा तिच्या उपकंपन्यांशी संबंधित काही शेतकरी आणि कारागिररांच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून, FabIndia चे दोन प्रमोटर बिमल नंदा बिसेल आणि मधुकर खेडा यांना अनुक्रमे 4,00,000 शेअर्स आणि 3,75,080 शेअर्स देतील. कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स फॅबइंडियाने आपल्या स्टोअर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी नवीन भांडवलात 250 कोटी उभारण्याची योजना आखली आहे, असे सांगितले जात आहे की 60 वर्षे जुन्या कंपनीचे अनेक गुंतवणूकदार त्यांचे स्टेक देखील विकतील, ज्यामुळे IPO चा एकूण आकार 3,800-4,000 कोटी रुपये होईल. कंपनीच्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि कंपनी विस्तारासाठी सज्ज आहे. Fabindia च्या एकूण व्यवसायात ई-कॉमर्स विक्रीचा वाटा 10-15 टक्के आहे. कंपनी यामध्ये आणखी विस्ताराची तयारी करत आहे. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी शेअर होल्डर्स कोण आहेत? Fabindia च्या विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये PI Opportunities Fund, Bajaj Holdings and Investment Ltd, Axis New Opportunities, India 2020 Fund II Limited (India 2020 Fund) II Ltd), Kotak India Advantage Fund, Azim Premji's Private equity Fund, Premium Investment Fund व्यतिरिक्त शेतकरी आणि कारागीर यांचा समावेश आहे. Infosys चे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी, एक्सेंचर प्रमुख रेखा मेनन आणि इन्फो एजचे संस्थापक संजीव बिखचंदानी रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे फाइलिंग दाखवतात. कंपनीमध्ये प्रमोटर्सचे 49 टक्के हिस्सेदारी आहे. युनिक बिझनेस मॉडेल फॅबिंडिया हे पारंपरिक कपड्यांसाठी ओळखले जाते. कंपनीने घर आणि जीवनशैली, पर्सनल केअर आणि ऑरगॅनिक फूड यासारख्या नवीन प्रोडक्ट्सच्या श्रेणींमध्ये गेल्या काही वर्षांत प्रवेश केला आहे. Fabindia कडे स्वतःचा कोणताही कारखाना नाही. त्याचे बिझनेस मॉडेल डिझाइनवर केंद्रित आहे. Fabindia 50000 हून अधिक कारागीर, विणकर आणि शिल्पकार आणि 2,200 हून अधिक शेतकरी आणि सुमारे 10,400 सहयोगी यांच्या भागीदारीत काम करत आहे. अनेक कारागीर आणि शेतकरी कुटुंबे पिढ्यानपिढ्या Fabindia सोबत काम करत आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या