• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Extra Income: नोकरीसोबतच करा 'हे' काम, महिन्याला होईल मोठी कमाई

Extra Income: नोकरीसोबतच करा 'हे' काम, महिन्याला होईल मोठी कमाई

अनेक संधी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्या तुम्हाला जादा कमाई करून देऊ शकतील. जर तुम्ही कष्ट केलेत तर नोकरीव्यतिरिक्त मोकळा वेळ तुम्ही इथे देऊन चांगले पैसे कमवू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : महागाई इतकी वाढली आहे की, आता अनेकजण नोकरी करण्यासोबतच जादा उत्पन्नाचे (Extra income) मार्ग शोधत असतात. महागाईमुळे मध्यमवर्गीय लोकांना तर महिन्याचा पगार (Salary) सुद्धा कमी पडतो. पगारातून घरखर्च भागवणंसुद्धा खूप कठीण होतं. अशावेळी इतर खर्चासाठी पैशांची गरज (Need money) असते. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पगाराव्यतिरिक्त पैसे कमवायचे (How to earn money) असतील, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही आयडिया (earning ideas) देणार आहोत, ज्या वापरून तुम्ही दरमहा मोठी कमाई (Earn money) करू शकता. या कामासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची (easy way to earn money from home) गरज नाही. तुम्ही प्रवास, गाव किंवा कुठेही हा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची सुद्धा गरज नाही. या व्यवसायासाठी, तुमच्याकडे फक्त स्मार्टफोन किंवा लॅपटॉप (Business via smartphones) असणं आवश्यक आहे याद्वारे तुम्ही दरमहा मोठी कमाई करू शकता. वाचा : सरकारी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी योजना; दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा, कसा? मॅट्रिक्स मेल डॉट कॉम Matrix mail.com ही वेबसाईट 2002 पासून कार्यरत आहे. येथे तुम्ही ईमेल वाचून पैसे कमवू शकता. या व्यतिरिक्त, आपण ऑफरद्वारे साइटला भेट देऊन पैसेदेखील कमवू शकता. या वेबसाइटद्वारे हे सर्व काम करून, तुम्ही 25 डॉलर ते 50 डॉलर पर्यंत कमवू शकता. एका तासात तुम्ही या वेबसाइटच्या माध्यमातून सुमारे 3000 रुपये कमवू शकता. पैसा लाइव्ह डॉट कॉम Paisa Live.com ही वेबसाइट तुम्हाला कोणतेही पैसे न गुंतवता हजारो रुपये कमवण्याची संधी देते. या वेबसाइटवर अकाउंट तयार करताच तुम्हाला 99 रुपये मिळतील. तसेच जर तुम्ही तुमच्या 20 मित्रांचे अकाउंट तयार केले तर तुम्हाला लगेच 20 रुपये मिळतील. प्रत्येक मेल वाचण्यासाठी तुम्हाला 25 पैसे ते 5 रुपये मिळतील. वेबसाइट 15 दिवसांत एकदा चेकद्वारे पेमेंट देते. वाचा : Income Tax Rules : काय आहे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड? जाणून घ्या ITR व्हेरिफिकेशन प्रक्रिया सेंडर अर्निंग डॉट कॉम senderearning.com या वेबसाइटवर तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. येथे एक ईमेल वाचल्यावर तुम्हाला एक डॉलर म्हणजेच सुमारे 70 रुपये मिळतील. मात्र या वेबसाइटला सातत्याने भेट देणे गरजेचे आहे. जर तुम्ही 6 महिने या वेबसाइटला भेट दिली नसेल तर तुमचे अकाउंट डिअ‍ॅक्टिव्ह केले जाईल. येथून तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी किमान 2100 रुपये कमवावे लागतील. अशा अनेक संधी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्या तुम्हाला जादा कमाई करून देऊ शकतील. जर तुम्ही कष्ट केलेत तर नोकरीव्यतिरिक्त मोकळा वेळ तुम्ही इथे देऊन चांगले पैसे कमवू शकता.
  First published: