Home /News /money /

डेबिट, क्रेडिट कार्डबाबतच्या नियमातील बदलांना मुदतवाढ, कोणते नियम बदलणार होते?

डेबिट, क्रेडिट कार्डबाबतच्या नियमातील बदलांना मुदतवाढ, कोणते नियम बदलणार होते?

रिझर्व्ह बँकेने `मास्टर डायरेक्शन'च्या काही तरतुदींच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 22 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँकांना बदलणारे बँकिंग नियमन, कायदे, परवाना यांसह विविध बाबतीत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात असतात, त्यानुसार बँकांचे कामकाज चालत असते. काही बदल अथवा मुदतवाढ सारख्या गोष्टीही रिझर्व्ह बँक बँकांना वेळोवेळी कळवत असते. बँका आणि NBFC (Non-Banking Financial कंपनी) यांच्या डेबिट तसंच क्रेडिट कार्ड संबंधीच्या काही नियमांत येत्या 1 जुलैपासून बदल होणार होते. मात्र, आता या बदलांची डेडलाईन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता 31 ऑक्टोबर 22 पर्यंत असणार आहे. याबाबतची वृत्त 'झी बिझनेस'ने दिलं आहे. बदल होणाऱ्या नियमांनुसार 1 जुलै 22 पासून बँका या ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांचं कार्ड `अ‍ॅक्टिव्ह' (active) करू शकणार होत्या. मात्र, याची डेडलाईन वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, बँका आणि NBFC 1 जुलैपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करण्यासाठी 'इश्युअन्स आणि कंडक्ट डायरेक्शन्स, 2022' वर (Issuance and Conduct Directions, 2022) मास्टर डायरेक्शन (Master Direction) लागू करणार होती. इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना? अधिसूचना जारी RBI ने उद्योगातील भागधारकांकडून मागणी करणारी अधिसूचना जारी केली आहे, त्यात असं म्हटलं आहे की, रिझर्व्ह बँकेने `मास्टर डायरेक्शन'च्या काही तरतुदींच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या तरतुदींसाठी अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यात क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्याशी संबंधित नियम आहेत. जाणून घेऊयात, क्रेडिट कार्ड संबंधीचे नियम रिझर्व्ह बँकेच्या मास्टर डायरेक्शननुसार, एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड जारी केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ते अ‍ॅक्टिव्ह केले नाही, तर कार्ड जारी करणारी बँक ही संबंधित कार्डधारकाकडून OTP (One Time Password) द्वारे ते कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मंजुरी घेऊ शकणार आहे. समजा, क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक ही, त्या कार्डधारकाकडून कोणतीही मान्यता मिळाली नाही तर, हे क्रेडिट कार्ड पुढील सात कामकाजाच्या दिवसांत कोणतेही शुल्क न आकारता रद्द करू शकणार आहे. खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार 'हे' 5 नियम या नियमांमध्ये होणार बदल याशिवाय, कार्डधारकाला 1 जुलैपर्यंत कार्डधारकाची संमती न घेता आधीच मंजूर केलेल्या क्रेडिट मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करण्यास सांगितले होते. या प्रकरणातही 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने भरलेले शुल्क आणि व्याजाच्या चक्रवाढीशी संबंधित नियम लागू करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
First published:

Tags: Credit card, Investment, Money

पुढील बातम्या