Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'हा' स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, तुमच्याकडे आहे का?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'हा' स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, तुमच्याकडे आहे का?

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) हा असा एक स्टॉक आहे ज्यामध्ये बिगबुलने आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत आपला हिस्सा वाढवला आहे. SAIL मधील राकेश झुनझुनवाला यांच्या स्टेकवर नजर टाकली तर जुलै-सप्टेंबर तिमाहीत 7.25 कोटी शेअर्स किंवा 1.76 टक्के होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 2 डिसेंबर : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड किंवा सेल (SAIL) च्या शेअर्सवर दबाव दिसत आहे. गेल्या 1 महिन्यात हा सरकारी मेटल स्टॉक (Metal Stock) 122.35 रुपयांवरून 102.90 रुपयांपर्यंत घसरला आहे. एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 15 टक्क्यांनी घसरला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) हा असा एक स्टॉक आहे ज्यामध्ये बिगबुलने आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत आपला हिस्सा वाढवला आहे. SAIL मधील राकेश झुनझुनवाला यांच्या स्टेकवर नजर टाकली तर जुलै-सप्टेंबर तिमाहीत 7.25 कोटी शेअर्स किंवा 1.76 टक्के होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या (Share Market Experts) मते, या शेअरने नवीन ब्रेकआउट दिला आहे आणि तो हायली बुलीश झोनमध्ये दिसत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी हा शेअर 172 रुपयांपर्यंतची पातळी दाखवू शकतो.

Proficient Equities चे मनोज दालमिया सांगतात की, गेल्या 4 तिमाहीत जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असूनही, या सरकारी कंपनीने नफा आणि प्रॉफिट मार्जिन ग्रोथ दिसली आहे. बाजाराला अपेक्षा आहे की या शेअरमध्ये पुढे जाऊन मजबूत रॅली पाहायला मिळेल. हेच कारण लक्षात घेऊन FII आणि FPI या शेअरमध्ये आपला हिस्सा वाढवत आहेत. या शेअरच्या ट्रेड व्हॉल्यूममध्येही वाढ झाली आहे, ज्यामुळे स्टॉकमध्ये क्लोजिंग बेसिसवर 100 रुपयांच्या आसपास नवीन ब्रेकआउट दिसून आले आहे.

Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर

Choice Broking चे सुमीत बगडिया म्हणतात की राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या स्टॉकचा चार्ट पॅटर्न पॉझिटिव्ह दिसत आहे. हा स्टॉक सध्याच्या पातळीवरही 115 रुपयांच्या इमिडिएट शॉर्ट टर्म टार्गेटसह खरेदी करू शकतो. ज्याच्याकडे हा शेअर आहे ते 125 रुपयांच्या शॉर्ट टर्मसाठी या स्टॉकमध्ये राहू शकतात.

Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख

आणखी एक तज्ज्ञ मनोज दालमिया सल्ला देतात की आक्रमक गुंतवणूकदार सध्याच्या स्तरावरही खरेदी करू शकतात आणि 100 रुपयांच्या खाली गेल्यास 92-95 रुपयांच्या पातळीच्या जवळ हळूहळू खरेदी करत राहू शकतात. यासाठी 89 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. मध्यम ते अल्प मुदतीसाठी हा शेअर 147-172 रुपयांची पातळी दाखवू शकतो.

First published:

Tags: Investment, Money, Share market