मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या 'या' स्टॉकवर तज्ज्ञांची नजर, शॉर्ट टर्ममध्ये मोठ्या प्रॉफिटचा अंदाज

Rakesh Jhunjhunwala यांच्या 'या' स्टॉकवर तज्ज्ञांची नजर, शॉर्ट टर्ममध्ये मोठ्या प्रॉफिटचा अंदाज

Indiabulls Housing Finance स्टॉक अशा काही दर्जेदार स्टॉकपैकी एक आहे ज्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये निगेटिव्ह सेन्टिमेंट्समुळे घसरण झाली आहे. तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की, या घसरणीत हा शेअर 440 रुपयांच्या लाँग टर्मसाठी चांगली खरेदीची संधी देत ​​आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) स्टॉक, भारतीय बाजारातील (Share Market) मोठ्या घसरणीच्या दरम्यान गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये 17 टक्क्यांनी घसरला आहे. बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की हा हाउसिंग फायनान्स (Indiabulls Housing Finance) स्टॉक अशा काही दर्जेदार स्टॉकपैकी एक आहे ज्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये (Short Term) निगेटिव्ह सेन्टिमेंट्समुळे घसरण झाली आहे. तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की, या घसरणीत हा शेअर 440 रुपयांच्या लाँग टर्मसाठी चांगली खरेदीची संधी देत ​​आहे.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया यांनी सांगितलं की अलीकडील विक्रीच्या दबावात, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स 250 रुपयांच्या पातळीवर घसरले आणि 200 रुपयांच्या मजबूत सपोर्टपर्यंत घसरले. 240-260 रुपयांच्या शॉर्ट टर्म टार्गेटसाठी 200 रुपयांच्या स्टॉप लॉससह हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी करावा.

सुमीत बगाडिया यांनी पुढे सांगितले की, या शेअरसाठी 250-260 रुपयांच्या पातळीवर रजिस्टन्स दिसतोय, पण एकदा हा रजिस्टन्स मोडला की, या शेअरमध्ये जोरदार वाढ होऊ शकते.

बँकेत कित्येक वर्ष वाट पाहावी लागली असती; 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे 5 दिवसात डबल!

GCL सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणतात की इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स सारखा दर्जेदार स्टॉक देखील बाजारात अलीकडच्या विक्रीचा बळी ठरला आहे. स्टॉकची फंडामेंटल खूप मजबूत आहेत. बाजारात ट्रेंड रिव्हर्स होताच शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येईल. हा स्टॉक डाउनसाइड स्ट्रॅटेजीसह चालू ठेवावा. शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर 290 रुपयांच्या वर जाताना दिसतो आहे. तर लाँग टर्मसाठी आपण त्यात 440 रुपयांची पातळी पाहू शकतो.

रोज 100 रुपये गुंतवा आणि बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत तुम्हाला बनवेल श्रीमंत

जर आपण इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर, जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग 50 लाख शेअर्स किंवा 1.08 टक्के आहे.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Investment, Money, Share market