Home /News /money /

सोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, इथे वाचा आजचे दर

सोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, इथे वाचा आजचे दर

शुक्रवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजारांच्या अगदी जवळपास पोहोचली आहे.

    नवी दिल्ली, 31 जुलै : सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सोन्याच्या किंमती रोज नवा रेकॉर्ड रचत आहेत. दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today) 55 हजारांच्या अगदी जवळपास पोहोचली आहे. तर चांदीची किंमत (Silver Price Today) देखील 2,854 रुपयांनी वाढली आहे. एचडीएफसी सिक्यूरिटीजच्या मते देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये घसरण झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती रेकॉर्ड ब्रेकिंग स्तरावर आहेत. ब्रोकरेज फर्म जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसच्या अहवालामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, कोरोनाची प्रकरणं वाढल्यानंतर आणि डॉलरचे मुल्य घसरल्यामुले सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय बँकांची कमजोर नीतिधोरणं आणि राजनैतिक अनिश्चिततांमुळे सोन्याच्या किंमती वाढण्यासाठी सपोर्ट मिळत आहे. सोन्याची नवीन किंमत (Gold Price on 31st July 2020) शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारत 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,851 रुपये प्रति तोळावरून 54,538 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. सोन्याची किंमतीमध्ये 687 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 53708 रुपये प्रति तोळ आहे. चांदीची नवीन किंमत (Silver Price on 31st July 2020) शुक्रवारी सोन्यापाठोपाठ चांदीचे भावही मोठ्या फरकाने वधारले आहेत. दिल्लीमध्ये एक किलो चांदीची किंमत 63,056 रुपयांवरून 65,910 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहेत. चांदीची किंमत 2854 रुपये प्रति किलोने वाढली आहे. मुंबईमध्ये प्रति किलो चांदीची किंमत 63,765 रुपये प्रति किलो आहे. 56  हजारावर सोन्याच्या किंमती जाण्याची शक्यता कमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते सोन्याच्या किंमती अशाच वाढत राहण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने अमेरिकन डॉलरमध्ये घसरण होत आहे, त्यानुसार स्पष्ट संकेत मिळत आहेत की सोन्याच्या किंमतीमध्ये होणारी वाढ सध्या तरी थांबणारी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे.  आर्थिक स्थिती कमजोर झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत लवकरत सोन्याच्या किंमती 56 हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. (हे वाचा-ऑगस्टमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी) दरम्यान भारतामध्ये सोन्याची मागणी घटून गेल्या 26 वर्षातील सर्वात कमी स्तरावर जाण्याची शक्यता आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिल (WGC) कडून ही शक्यता उपस्थित करण्यात येत आहे. यामागे सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली ऐतिहासिक वाढ आणि कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण ही महत्त्वाची कारणे आहेत. एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये भारतातील सोन्याची मागणी 70 टक्क्यांनी कमी होऊन 63.7 टनवर पोहोचली आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या