मराठी बातम्या /बातम्या /मनी /PolicyBazaar IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही? काय सांगतात एक्सपर्ट?

PolicyBazaar IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही? काय सांगतात एक्सपर्ट?

PolicyBazaar  या IPO मधून कंपनी 5709.72 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. त्यात 3750 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे. तर, 1959.72 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील.

PolicyBazaar या IPO मधून कंपनी 5709.72 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. त्यात 3750 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे. तर, 1959.72 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील.

PolicyBazaar या IPO मधून कंपनी 5709.72 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. त्यात 3750 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे. तर, 1959.72 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील.

मुंबई, 1 नोव्हेंबर : PolicyBazaar आणि Paisabazaar.com चे मालक असलेल्या PB Fintech चा IPO आजपासून ओपन झाला आहे. हा इश्यू 3 नोव्हेंबरला बंद होणार आहे. आता PB Fintech मध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत.

PolicyBazaar चा IPO किंवा PB Fintech IPO ची किंमत 940-980 रुपये आहे. एक लॉट 15 शेअर्सचा आहे. म्हणजेच, तुम्हाला किमान 15 शेअर्स खरेदी करावे लागतील. 980 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडनुसार किमान 14700 रुपये गुंतवावे लागतील. शेअर्सचे वाटप 10 नोव्हेंबरला होईल आणि 15 नोव्हेंबरला लिस्टिंग होऊ शकतो.

पॉलिसीबाझार या IPO मधून कंपनी 5709.72 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. त्यात 3750 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे. तर, 1959.72 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील.

कंपनीचे म्हणणे आहे की फ्रेश इश्यूमधील1,500 कोटी ब्रँडला मजबूत करण्यासाठी आणि 375 कोटी नवीन संधी शोधण्यासाठी वापरले जातील. तर, 600 कोटी रुपये धोरणात्मक गुंतवणुकीसाठी वापरले जातील. 375 कोटी रुपये भारताबाहेर व्यवसाय विस्तारासाठी वापरण्यात येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

दररोज 200 रुपये गुंतवणूक करुन मिळेल 32 लाखांचा फंड, काय आहे योजना आणि किती असेल कालावधी

या आयपीओमध्ये पैसे गुंतवावे की नाही?

केआर चोकसी सिक्युरिटीजच्या मते, कंपनीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विमा क्षेत्राच्या मोठ्या बाजारपेठेत काम करत आहे. ज्यामध्ये अजूनही भरपूर संधी आहेत. कारण विमा बाजार झपाट्याने वाढत आहे. कंपनी डिजिटल मार्केट प्लेसमध्ये लीडरशीप पोझिशनमध्ये आहे. कंपनी नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे, ज्याचा फायदा होत आहे.

यावर्षी युजर्सनी वेबसाईटला 12.65 कोटीहून अधिक वेळा भेट दिली. कंपनीकडे आपले ग्राहक टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. यासोबतच विमा कंपन्या आणि कर्ज देणार्‍या भागीदारांसोबतच्या चांगल्या संबंधांचाही कंपनीला फायदा होत आहे. त्यामुळे कंपनीचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.

Post Office Scheme: दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख

परंतु दुसरा पैलू असा आहे की कोरोना व्हायरस संसर्गामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यामुळे त्यांची पॉलिसी खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे. कंपनीला आधीच तोटा सहन करावा लागला आहे. केआर चोकसी असं सुचवतात की, जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही पॉलिसी बाजार IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही IPO च्या लिस्टिंगमध्ये नफा कमावण्याचा विचार करत असाल तर तुमची निराशा होऊ शकते.

ट्रस्टलाईन सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष राजीव कपूर सल्ला देतात की, वॅल्युएशनच्या बाबतीत लिस्टिगं झाल्यानंतर वरच्या किंमतीच्या बँडनुसार त्याचा P/E 47.6 आहे, जो प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा जास्त आहे. कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि व्हॅल्युएशन लक्षात घेऊन ट्रस्टलाईन सिक्युरिटीजने या इश्यूला न्यूट्रल रेटिंग दिले आहे.

First published:

Tags: Money, Share market