मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Indiabulls Housing Finance, Cipla, Meghmani Organics आणि BEML शेअरमध्ये काय करावं? तज्ज्ञांचं मत काय?

Indiabulls Housing Finance, Cipla, Meghmani Organics आणि BEML शेअरमध्ये काय करावं? तज्ज्ञांचं मत काय?

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 नोव्हेंबर : भारतीय बाजारात (Share Market) सोमवारी पुन्हा एकदा पडझड पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन वेरिएंट ओमिक्रोनने (Omicron Variant) जगभरात दहशत निर्माण केली आहे. युरोपमधील कोविड-19 ची (Covid 19) वाढती प्रकरणे आणि भारतीय बाजारातील FII ची विक्री यामुळे देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे. फार्मा इंडेक्स वगळता, सर्व सेक्टर लाल चिन्हात दिसत आहेत.

Anand Rathi फर्मच्या मेहुल कोठारी यांचे खालील स्टॉक्सवर काय मत आहे?

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स (Indiabulls Housing Finance)

बाजारातील नुकत्याच झालेल्या मंदीच्या काळातही या शेअरने चांगली कामगिरी केली आहे आणि तो अजूनही मजबूत होण्याची चिन्हे दाखवत आहे. सध्या, स्टॉक त्याच्या 200 दिवसांच्या SMA च्या वर कन्सोलिडेट होत असल्याचे दिसत आहे. शेअर 265 रुपयांच्या वर गेल्यावर तो 300-350 रुपयांकडे जाताना दिसेल. अशा परिस्थितीत ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये राहण्याचा सल्ला दिला जाईल. स्टॉकसाठी 200 वर जबूत सपोर्ट आहे.

शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट

सिप्ला (Cipla)

गेल्या काही महिन्यांपासून बहुतांश फार्मा शेअर्सवर दबाव आहे. सिप्ला आणि फार्मा सेक्टरमधील बहुतेक स्टॉक कोरोनाच्या नवीन वेरिएंटनंतर संपूर्ण जगाला नवसंजीवनी देत ​​आहेत. त्यामुळे अलीकडे या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. या शेअरसाठी 870 रुपयांची पातळी खूप महत्त्वाची आहे. या शेअरने ही पातळी ओलांडली तर त्यात 1000-1200 ची पातळीही दिसू शकते. त्यामुळे ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी तो होल्ड करावा.

मेघमणी ऑरगॅनिक्स (Meghmani Organics)

या शेअरमध्ये गेल्या ट्रेडिंग सत्रात 20 टक्क्यांची वरची सर्किट दिसली होती. ही तेजी प्रचंड मोठ्या प्रमाणात आली. ज्यांच्याकडे हा शेअर आहे त्यांनी त्यात 80 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. पुढे, आपण या समभागात रु. 120-140 ची पातळी देखील पाहू शकतो.

Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

BEML

सध्या हा स्टॉक 1700 रुपयांच्या ऑलटाईम हायभोवती फिरत आहे. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांनी ताबडतोब या स्टॉकमधून बाहेर पडावे. आणि नवीन एन्ट्रीसाठी मंथली क्लोजची वाट पाहावी. 1700 रुपयांच्या वर मंथली क्लोजिंग झाल्यास या स्टॉकची ताकद निश्चित केली जाईल. जर असे झाले नाही तर काही काळासाठी हा शेअर कन्सोलिडेशनच्या फेजमध्ये जाऊ शकतो, डाउनसाइडवर, त्यासाठी 1500 रुपयांचा सपोर्ट दिसतो.

First published:

Tags: Money, Share market