मुंबई, 3 डिसेंबर : बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwal) हे कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात याकडे किरकोळ गुंतवणूकदारांचं (Retail Investors) लक्ष असतं. राकेश झुनझुनवाला यांच्या यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) अशा अनेक शेअर्सचा समावेश आहे जे 2021 चे मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत. अनंत राज (Anant Raj) हा असाच एक स्टॉक आहे ज्याने 2021 मध्ये आतापर्यंत 150 टक्के परतावा दिला आहे. हा मल्टीबॅगर रिअॅल्टी स्टॉक 2021 च्या सुरुवातीपासून 27 रुपयांवरून 67.45 रुपयांपर्यंत गेला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा हा आवडता स्टॉक मध्यम ते दीर्घ मुदतीत तिहेरी आकडा गाठू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
बाजारातील दिग्गजांचे म्हणणे आहे की निफ्टी रियल्टी इंडेक्स 10 वर्षांचा ब्रेकआउट पाहत आहे. हे पाहता, मजबूत फंडामेंटल्स असलेले रिअॅल्टी शेअर येत्या ट्रेडिंग सत्रात जोरदार कामगिरी करताना दिसतील असे दिसते. अनंत राज यांच्या शेअर्समध्ये FPIs आणि FIIs देखील इंटरेस्ट दाखवत असल्याचे दिसत आहे. याशिवाय, कोरोनाचा दबाव असतानाही कंपनीची कामगिरी गेल्या 3 तिमाहीत मजबूत आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी
लाँग टर्मसाठी 155 रुपयांचं टार्गेट
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनंत राजच्या शेअरच्या किमतीला 80 रुपयांच्या आसपास मजबूत रजिस्टंन्सचा सामना करावा लागू शकतो, परंतु जर हा अडथळा तुटला, तर हा शेअर दीर्घ मुदतीसाठी 100 रुपये आणि नंतर 155 रुपयांचे टार्गेट देऊ शकेल.
Choice Broking चे सुमीत बगडिया सांगतात की, राकेश झुनझुनवाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 65-67 रुपयांच्या आसपास कन्सॉलिडेट होत असल्याचे दिसत आहे. यासाठी 80 रुपयांच्या आसपास मोठा अडथळा दिसत आहे. क्लोजिंग बेसिसवर जर तो 80 रुपयांची पातळी तोडतो, तर आपण लवकरच यामध्ये 100 रुपयांची पातळी पाहू शकतो.
शॉर्ट टर्म गुंतवणूकदार सध्याच्या किमतीवर या स्टॉकमध्ये बेट लावू शकतात आणि सुमारे 80 रुपये नफा बुक करू शकतात. परंतु या खरेदीसाठी त्यांनी 60 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला पाहिजे.
Paytm ला पहिल्यांदा एखाद्या ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईज किती?
Proficiant Equities लिमिटेडचे मनोज दालमिया म्हणतात की या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये दीर्घकाळ रहा. सध्याच्या पातळीवरही या स्टॉकमध्ये खरेदी होऊ शकते. यासाठी 60 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. 155 रुपयांच्या लाँग टर्म टार्गेटसाठी स्टॉकमध्ये राहण्याचा सल्ला ते देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market