नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देत आहे. अनेक ग्राहकांना याबाबत माहिती नसते. दर महिन्याला केवळ 28.5 रुपये जमा करुन 4 लाख रुपयांचा फायदा घेता येईल.
काय आहे ही सुविधा -
4 लाखांचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. ही योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे. या स्किममध्ये गुंतवणूक करण्यासाठीची रक्कम अतिशय कमी आहे. या दोन्ही स्किममध्ये मिळून वर्षाला 342 रुपये म्हणजेच दर महिन्याला 28 रुपये जमा करावे लागतात.
PMJJBY केवळ 330 रुपयांच्या वार्षिक रकमेवर 2 लाखांचा फायदा -
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला लाइफ कव्हर मिळतो. जर विमाधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना -
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana PMSBY) अतिशय कमी प्रीमियममध्ये जीवन विमा देते. केंद्र सरकारकडून PMSBY एक अशी स्किम आहे, ज्याअंतर्गत केवळ 12 रुपयांत खातेधारकाला 2 लाक रुपयांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो.
जनधन खातेधारकांना मोफत मिळतो 2 लाखांचा फायदा -
बँकेकडून जनधन खातेधारकांना ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा अॅक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देते.
अटल पेन्शन योजना -
केंद्र सरकारने कमी गुंतवणुकीत पेन्शन गॅरंटी अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेंतर्गत सरकार 1000 पासून 5000 रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. सरकारच्या या स्किममध्ये 40 वर्षापर्यंतचा व्यक्ती अर्ज करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance