मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केंद्र सरकार PM Funds मधून देशातील सर्व कुटुंबांना 10 हजार देणार? जाणून घ्या काय आहे सत्य

केंद्र सरकार PM Funds मधून देशातील सर्व कुटुंबांना 10 हजार देणार? जाणून घ्या काय आहे सत्य

केंद्र सरकारकडून सतत बनावट, खोट्या बातम्यांबाबत लोकांना जागरुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टमध्ये, भारत सरकार  'PM Funds' अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये देत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान, देशातील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले. कोरोनाच्या काळात लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. सध्या अनलॉकमध्ये हळू-हळू देशातील अर्थव्यवस्था आणि रोजगार पूर्वपदावर येत आहेत. एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय बेरोजगारी दर 23 टक्क्यांवर पोहचला. तर सप्टेंबरमध्ये 6 टक्क्यांच्या जवळपास आला आहे. याचदरम्यान, भारत सरकार पीएम फंडअतंर्गत प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये देत असल्याची एक बातमी व्हायरल होत आहे.

केंद्र सरकारकडून सतत बनावट, खोट्या बातम्यांबाबत लोकांना जागरुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टमध्ये, भारत सरकार 'PM Funds' अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये देत असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) पडताळणीत ही व्हायरल बातमी खोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे. PIB नुसार, हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. भारत सरकारने अशाप्रकारची कोणताही घोषणा केली नसून 'PM Funds' सारखा कोणताही फंड नसल्याचं, पीआयबीने त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये सांगितलं आहे.

(वाचा - Ration Cardमध्ये नाव जोडणीबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश;या वंचित घटकासाठी निर्णय)

(वाचा - दिवाळीच्या दिवसांत टाळा 5 चुका, अन्यथा लायसन रद्द होऊ शकतं)

जर तुम्हालाही कोणत्याही सरकारी योजना किंवा सरकारी योजनेच्या सत्यतेबाबत कोणताही संशय असल्यास, तुम्हीही ती माहिती पीआयबी फॅक्ट चेकसाठी पाठवू शकता. विविध सोशल मीडिया किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा मेलद्वारे पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सऍपवरून 8799711259 संपर्क करू शकता. त्याशिवाय ट्विटरवर @PIBFactCheck फेसबुकवर PIBFactCheck आणि ईमेलद्वारे pibfactcheck@gmail.com ही संपर्क करू शकता.

First published:

Tags: Money