मराठी बातम्या /बातम्या /मनी /

‘या’बॉसची अजब घोषणा! आठवड्याचे चार दिवस काम करूनही मिळणार पूर्ण पगार

‘या’बॉसची अजब घोषणा! आठवड्याचे चार दिवस काम करूनही मिळणार पूर्ण पगार

डेनिस मोरियरी यांनी आपल्या कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण राबवायला सुरुवात केलीय.

डेनिस मोरियरी यांनी आपल्या कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण राबवायला सुरुवात केलीय.

डेनिस मोरियरी यांनी आपल्या कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण राबवायला सुरुवात केलीय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • | new delhi

कोणत्याही कंपनीसाठी त्यांचे कर्मचारी ही खूप मोठी संपत्ती असते. कंपनी आणि बॉस नेहमीच कर्मचार्‍यांना आनंदी ठेवण्यासाठी नियोजन करत असतात. कधी वैद्यकीय सेवेचे फायदे, सहली किंवा विविध पॉलिसीज राबवून कर्मचार्‍यांना खूश करतात. कधी-कधी व्हेकेशनसाठी वेगळी सुट्टी मंजूर करतात. अशीच एक घटना घडलीय. एका बॉसने आपल्या कर्मचार्‍यांना अतिरिक्त सुट्टी देऊन खूश केलंय.

बॉसच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांची भावना - 

अवर कम्युनिटी नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या बॉसने म्हणजेच डेनिस मोरियरी यांनी एक घोषणा केलीय. डेनिस यांनी कर्मचार्‍यांना कामासाठी आठवड्याचे चारच दिवस ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीची सुट्टी देताना पगार कापणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. यामुळे कर्मचारी आपल्या बॉसच्या निर्णयाने खूप खूश आहेत.

आठवड्याचे चारच दिवस काम करण्याची पॉलिसी

डेनिस मोरियरी यांनी आपल्या कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण राबवायला सुरुवात केलीय. या पॉलिसीचा त्यांना खूपच फायदा झाल्याचं समजतं. डेली स्टारच्या वृत्तानुसार डेनिस असं म्हणतात, की या पॉलिसीचं त्यांच्या कर्मचार्‍यांनी स्वागत केलं. ऑगस्ट महिन्यापासून या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. कर्मचार्‍यांचं मन राखण्यासाठी त्यांनी ही ट्रायल पॉलिसी कायमची लागू करण्याचं ठरवलं आहे. ही प्रायोगिक अर्थात पायलट स्कीम 4 डे वीक ग्लोबल नावाच्या नॉन प्रॉफिट कम्युनिटीकडून लॉंच झाली होती.

पगार न कापता कामाच्या तासात 20 टक्क्यांनी कपात

या स्कीमविषयी बोलताना डेनिस म्हणाले, की 'ही स्कीम ऑफिससाठी उपयुक्त आहेच; पण कर्मचार्‍यांसाठीही उत्तम आहे. यामुळे कर्मचार्‍यांना अपेक्षित स्वातंत्र्य मिळेल. तसंच उरलेले 3 दिवस ते एखादा छंद, आवड जोपासतील. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतील. सध्या ही 6 महिन्यांची ट्रायल पॉलिसी आहे; पण ही पॉलिसी पुढेही सुरू राहील. या नव्या धोरणामुळे कंपनीकडून कर्मचार्‍यांच्या कामाचे तास 20 टक्क्यांनी कमी होताहेत; पण पगार मात्र पूर्ण मिळणार आहे. फक्त आठवड्यातल्या या 4 दिवसांचे कामाचे तास वाढवण्यावर भर दिला जाईल.'

अनेक जण वीकेंडची वाट पाहत असतात. कारण वीकेंडच्या दिवशीच आपले छंद, आवड जोपासायला वेळ मिळतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्य आणि काम यांची सांगड घालणं अवघड होऊन बसतं. इच्छा असूनही कुटुंबीयांसाठी वेळ काढणं होत नाही; पण डेनिस मोरियरी यांच्या या योजनेत कंपनीच्या आणि कर्मचार्‍यांच्या उत्तम भवितव्यचा विचार दिसतोय यात शंका नाही.

First published:

Tags: Job