Home /News /money /

लॉकडाऊन काळात 21 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी सरकारच्या 5 मोठ्या घोषणा

लॉकडाऊन काळात 21 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी सरकारच्या 5 मोठ्या घोषणा

लॉकडाऊनच्या काळात ESIC ने कर्मचारी आणि अन्य लाभार्थ्यांसाठी प्रायव्हेट मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी करण्याकरता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊयात सरकारने कोणत्या मोठ्या घोषणा केल्या आहेत.

    नवी दिल्ली, 29 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध योजना घेऊन येत आहे. यामध्येच केंद्र सरकारने इएसआयसी योजनेचा (ESIC) लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक एकरकमी योगदान जमा झालेले नसतानाही 30 जून 2020 पर्यंत या  कर्मचाऱ्यांना सर्व मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांचा  मासिक पगार 21 हजारांपेक्षा कमी आहे आणि जे कमीत कमी 10 कर्मचारी असणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. 2016 पर्यंत ESIC चा लाभ घेणाऱ्यांसाठी पगाराची मर्यादा 15 हजार होती. 1 जानेवारी 2017 मध्ये ही मर्यादा वाढवून 21 हजार करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या 5  मोठ्या घोषणा 1. सर्व सुविधा मिळणार- ESIC ने अशी घोषणा केली आहे की, लॉकडाऊन काळात कंपन्या भरावी लागणारे वार्षिक एकरकमी योगदान देऊ नाही शकले तरीही कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या मेडिकल सेवा सुरूच राहतील. (हे वाचा-3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर कधी सुरू होणार रेल्वे?आज निर्णय होण्याची शक्यता) 2. एक्सपायर झालेल्या कार्डचा देखील वापर करू शकाल- कर्मचाऱ्यांचे मेडिकल कार्ड ज्याअंतर्गत त्यांना सुविधा मिळतात, त्याची वैधता संपली असली तरीही काळजी करण्याची बाब नाही. जुन्या कार्डावर मिळणाऱ्या सुविधा त्यांना यावेळीही मिळत राहतील. 3. खाजगी मेडिकल दुकानातून घेऊ शकता औषधं-लॉकडाऊनच्या काळात  ESIC ने कर्मचारी आणि अन्य लाभार्थ्यांसाठी प्रायव्हेट मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी करण्याकरता सुविधा उपलब्ध  करून दिली आहे. प्रायव्हेट दुकानांतून औषधं खरेदी केल्यानंतर हे कर्मचारी ESIC मध्ये खर्च केलेल्या पैशांसाठी क्लेम करू शकतात. ज्यांना दररोज औषधं घ्यावी लागतात आणि लॉकडाऊनमुळे रुग्णालयामध्ये जाता येत नाही आहे अशांना मोठा दिलासा मिळेल. (हे वाचा-आधार अपडेट करण्यासाठी UIDAIने दिली नवी माहिती,आता याकरता बँकेत जाण्याची गरज नाही) 4. अन्य रुग्णालयांमध्ये होणार उपचार- ज्या रुग्णालयांना कोव्हिड-19 च्या रुग्णालयांमध्ये बदलण्यात आले आहे, त्याठिकाणी उपचार घेणाऱ्यांनी सुद्धा चिंता करण्याचे कारण नाही.  इतर इलाज करणाऱ्या विविध रुग्णालयांमध्ये ESIC योजनेचा लाभ घेणाऱ्यांना उपचार मिळणार आहेत. 5. कंपन्यांना दिलासा-ESIC ने कंपन्यांना दिलासा देत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम भरण्यासाठी कालावधी 15 मे 2020 पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनचे संकट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या