एका रात्रीत 24 वर्षांचा तरूण झाला अब्जाधीश, ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त संपत्ती मिळाली गिफ्ट

एका रात्रीत 24 वर्षांचा तरूण झाला अब्जाधीश, ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त संपत्ती मिळाली गिफ्ट

पदवीचं शिक्षण पूर्ण करताच तरुण अब्जाधीश झाला असून जगातील सर्वात श्रीमंत 550 लोकांच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश झाला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर : पेनेसिल्विनियातील व्हॉर्टन स्कूल ऑफ फायनान्स इथं पदवीचं शिक्षण पूर्ण करणाऱा 24 वर्षीय तरुण एका रात्रीत अब्जाधीश झाला आहे. त्यानं एकूण संपत्तीच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकलं आहे. चीनची सिनो फार्मास्यूटिकल कंपनीचे संस्थापक त्से पिंग आणि त्यांची पत्नी चेयुंग लिंग चेंग यांनी कंपनीचे 21.5 टक्के शेअर्स मुलगा एरिक त्सेला गिफ्ट म्हणून दिले. कंपनीच्या या शेअर्सची किंमत 3.8 अब्ज डॉलर म्हणजे 269 अब्ज रुपये इतकी होते.

एरिक त्सेला देण्यात आलेला शेअर्सचा वाटा हा कंपनीच्या भागिदारीतील पाचवा हिस्सा आहे. सिनो फार्मास्यूटिकलने एरिकला फक्त शेअर्सचा वाटा दिलेला नाही तर त्याला कंपनीचा संचालकही केलं आहे. एरिकच्या आई-वडिलांनी गेल्या आठवड्यातच हा निर्णय घेतला. कंपनीच्या म्हणण्यानुसार तो एका वर्षात 5 लाख डॉलरपेक्षा जास्त कमाई करेल. तसेच त्याच्या आई-वडिलांनी म्हटलं की, मुलाला गिफ्ट देण्याचा उद्देश कुटुंबाची संपत्ती आणि वारसा त्याच्याकडं सोपवणं हाच आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एरिक आता 550 व्यक्तींपैकी एक आहे. कंपनीला तो श्रीमंताच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे यात स्वारस्य नाही. सध्या त्याची संपत्ती ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हॉलीवूडचा दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्यापेक्षा जास्त आहे. एरिकने बिजिंग आणि हाँगकाँगमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पेनिसिल्विया विद्यापीठात व्हॉर्टन स्कूल ऑफ फायनान्समधून पदवी घेतली.

हाँगकाँगमधील कमीत कमी पाच इतर कंपन्यांमध्ये एरिकची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे अब्जाधीश वडिल त्से पिंग हे चीनमधील वरिष्ठ राजकीय सल्लागारांच्या समुहातील सदस्य होते. एरिकने सांगितलं की, माझे आई-वडील आणि मोठ्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रोत्साहन दिलं. ज्यावेळी 19 वर्षांचा होतो तेव्हा विचार करत होतो की त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू शकेन. मला मिळालेली सकारात्मकता माझ्या आजुबाजुच्या लोकांमध्ये निर्माण करेन.

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: china
First Published: Oct 28, 2019 07:57 AM IST

ताज्या बातम्या