नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर ! आता EPS पेन्शनचे पैसे अ‍ॅडव्हान्स मिळणार

नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर ! आता EPS पेन्शनचे पैसे अ‍ॅडव्हान्स मिळणार

या सुविधेनुसार, पेन्शनधारकाला पेन्शनच्या आगाऊ रकमेचा काही भाग एकरकमी दिला जातो. आता नव्या बदलांमुळे पेन्शन योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. रिटायरमेंटनंतर 15 वर्षांनी पूर्ण पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे.कामगार मंत्रालयाने नव्या नियमांची घोषणा केली आहे. याशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)योजनेत पीएफ खातेधारकांसाठी (PF Account holders)एकरकमी पेन्शन काढण्याची मुभा देण्यात आली आहे. 26 सप्टेंबर 2008 च्या आधी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो. कम्युटेड पेन्शनचा पर्याय निवडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांनी पूर्ण पेन्शनचा फायदा दुसऱ्यांदा मिळू लागेल.

काय आहे नियम ?

कर्मचारी पेन्शन स्कीम म्हणजेच EPS च्या नियमांनुसार 26 सप्टेंबर  2008 च्या आधी रिटायर झालेले EPFO सदस्य त्यांच्या पेन्शनच्या एकतृतियांश रक्कम एकरकमी मिळवू शकतात. उरलेली दोन तृतियांश पेन्शन त्यांच्या आयुष्यभर मासिक पेन्शनच्या रूपात मिळत राहील. याआधी 15 वर्षांनंतर पूर्ण पेन्शन देण्याची तरतूद होती. ही तरतूद सरकारने 2009 मध्ये रद्द केली. आता मात्र पुन्हा एकदा या निर्णयाची अमलजावणी करण्यात येईल. जर कुणी 1 एप्रिल 2005 ला निवृत्त झालं तर त्या कर्मचाऱ्याला 1 एप्रिल 2020 ला म्हणजे 15 वर्षांनी पेन्शनची रक्कम मिळेल.

(हेही वाचा : रविवारपासून अमित शहा कुठे होते? दिल्लीतल्या हिंसाचारावरून सोनियांचा हल्लाबोल)

अ‍ॅडव्हान्स पेन्शनची सुविधा

या सुविधेनुसार, पेन्शनधारकाला पेन्शनच्या आगाऊ रकमेची काही भाग एकरकमी दिला जातो. पूर्ण मासिक पेन्शन देण्याच्या प्रस्तावाला EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची 21 ऑगस्ट 2019 ला हिरवा कंदिल दिला होता. आता नव्या बदलांमुळे पेन्शन योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

(हेही वाचा :सोनिया गांधी अॅक्शनमध्ये, 20 जणांच्या मृत्यूनंतर अमित शहांना विचारले थेट प्रश्न)

=============================================================================================

First published: February 26, 2020, 2:35 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या