मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांनाही पेन्शन, किती वयापर्यंत मिळत राहणार ही रक्कम? EPFO ने दिली माहिती

EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांनाही पेन्शन, किती वयापर्यंत मिळत राहणार ही रक्कम? EPFO ने दिली माहिती

कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ त्या अनाथ मुलांना मिळू शकतो, ज्यांचे पालक एक तर पगारदार होते किंवा ईपीएस सदस्य होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ईपीएस योजनेअंतर्गत अनाथ मुलांना मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 नोव्हेंबर: कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Coronavirus Pandemic) देशात लाखो जणांचा मृत्यू (Death) झाला. अनेक कुटुंबं अक्षरशः उघड्यावर आली. अनेक कुटुंबांतल्या तरुण व्यक्तींचा मृत्यू झाल्यानं कमाई करणारं कोणीच उरलं नाही. काही कुटुंबांतल्या लहान मुलांनी आपले आई-वडील गमावले. कोरोनाने अनेक मुलांना अनाथ केलं. काही ठिकाणी तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांतल्या मुलांची तर यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या अशा मुलांसाठी सरकारने आर्थिक मदत योजना राबवली आहे; पण त्याचबरोबर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS) आर्थिक साह्य मिळण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे अनेक अनाथ मुलांना दिलासा मिळाला आहे.

कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ त्या अनाथ मुलांना मिळू शकतो, ज्यांचे पालक एक तर पगारदार होते किंवा ईपीएस सदस्य होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ईपीएस योजनेअंतर्गत अनाथ मुलांना मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली आहे. या संदर्भात एक ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा-PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे

ईपीएस योजनेअंतर्गत अनाथ मुलांना मिळणारे फायदे

- या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना मासिक पेन्शन (Monthly Pension) मिळेल. हे पेन्शन मासिक विधवा निवृत्ती वेतनाच्या 75 टक्के असेल.

- ही रक्कम दरमहा किमान 750 रुपये असेल.

- दोन अनाथ मुलांपैकी प्रत्येकाला दरमहा 750 रुपये पेन्शन मिळेल.

- ईपीएस योजनेअंतर्गत अनाथ मुलांना वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पेन्शन दिलं जाईल.

- मुलांना काही अपंगत्व आलं असेल तर त्यांना आयुष्यभर पेन्शन (Lifetime Pension) दिलं जाईल.

हे वाचा-Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना

यासाठी काही पेमेंट केलेलं असणं अपेक्षित आहे का?

- ईपीएससाठी (EPS) कंपनी कर्मचार्‍यांच्या पगारातून (Salary) एकही पैसा कापत नाही.

- कंपनीच्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.

- नवीन नियमानुसार 15,000 रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्यांनादेखील ही सुविधा मिळणार आहे.

- नवीन नियमानुसार, पगाराच्या 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा केली जाते.

- मूळ वेतन 15,000 रुपये असेल तर कंपनी ईपीएसमध्ये 1,250 रुपये जमा करते.

पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक

कर्मचारी पेन्शन योजना-1995 (EPS-95) अंतर्गत पेन्शनसाठी हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात सादर करणं अनिवार्य आहे. दर वर्षी पेन्शनधारकांना हे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. त्यामुळे पेन्शन मिळण्यास कोणताही अडथळा येत नाही. आता व्हिडिओ कॉलद्वारे हे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal