मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO Update: घरबसल्या PF चे पैसे ट्रान्सफर कसे करणार? चेक करा सोपी प्रोसेस

EPFO Update: घरबसल्या PF चे पैसे ट्रान्सफर कसे करणार? चेक करा सोपी प्रोसेस

 पीएफचे पैसे ऑनलाइन कुठेही ट्रान्सफर करण्यासाठी प्रथम खातेधारकाला त्याचा UAN अॅक्टिव्ह करावा लागेल. याशिवाय, खातेधारकाचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर सर्व तपशील अचूक आणि योग्यरित्या प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 जुलै : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ​यूजर्सच्या सोयीसाठी अनेक सेवा पुरवते. पीएफमधून पैसे ऑनलाईन पैसे कसे काढता येतील. तुम्हाला घरबसल्या काही मिनिटांत पीएफमधील पैसे दुसऱ्या खात्यात कसे ट्रान्सफर करू शकता येतील याबद्दल माहिती घेऊया.

EPF मध्ये दर महिन्याला तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ म्हणून जमा केला जातो. त्यावर ठराविक व्याजही मिळते. तुम्ही नोकरी सोडली तरी पीएम खाते तसेच राहते. पीएफचे पैसे ऑनलाइन कुठेही ट्रान्सफर करण्यासाठी प्रथम खातेधारकाला त्याचा UAN अॅक्टिव्ह करावा लागेल. याशिवाय, खातेधारकाचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर सर्व तपशील अचूक आणि योग्यरित्या प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल होतील?

ईपीएफ ऑनलाइन कसं ट्रान्सफर करणार?

>> आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface वेबसाईटवर जा.

>> येथे तुम्हाला तुमचा UAN क्रमांक टाकून पासवर्ड टाकावा लागेल, त्यानंतर लॉग-इन होईल.

>> ऑनलाइन सेवेसाठी वन मेंबर वन ईपीएफ वर तुम्ही ज्या कंपनीत आहात त्या कंपनीशी संबंधित माहिती देणारे पीएफ खाते तुम्हाला वेरिफाय करावे लागेल.

>> नंतर 'Get Details' पर्यायावर तुम्हाला आधीच्या कंपनीच्या पीएफशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

>> येथे तुम्हाला पूर्वीची कंपनी आणि सध्याची कंपनी यातील निवड करावी लागेल. दोनपैकी कोणतीही कंपनी निवडा आणि सदस्य आयडी किंवा UAN द्या.

>> आता 'गेट ओटीपी' ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो OTP एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या EPF खात्याची ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईल.

First published:

Tags: Epfo news, Money